Pakistan Citizen Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानसमोर नवं संकट, 3 वर्षात फेडावे लागणार इतके परकीय कर्ज; दिवाळखोरी...!

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसमोर आणखी एक संकट दत्त म्हणून उभे ठाकले आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसमोर आणखी एक संकट दत्त म्हणून उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत असलेला पाकिस्तान प्रत्येक आघाडीवर त्रस्त आहे.

पाकिस्तानला एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान $77.5 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडायचे आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशासमोर नोटबंदीचा धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानला 'विघटनकारी परिणामांना' सामोरे जावे लागू शकते.

पाकिस्तानसमोर दिवाळखोरीचा धोका

युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस (यूएसआयपी) या अमेरिकेतील संशोधन संस्थेने एका विश्लेषणात याबाबत इशारा दिला आहे.

जिओ न्यूजने यूएसआयपीचा हवाला देत म्हटले आहे की, गगनाला भिडणारी महागाई (Inflation), राजकीय संघर्ष आणि वाढता दहशतवाद, मोठ्या प्रमाणावर परदेशी कर्ज देयांमुळे पाकिस्तान सध्या दिवाळखोरी उंबरठ्यावर उभा आहे.

परकीय चलनाचा साठा कमी होत आहे

पाकिस्तान सध्या उच्च परकीय कर्ज, कमजोर स्थानिक चलन आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्याने त्रस्त आहे. यूएसआयपीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एप्रिल 2023 ते जून 2026 पर्यंत पाकिस्तानला (Pakistan) $ 77.5 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडायचे आहे, जे $ 350 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी 'मोठी रक्कम' आहे.

या अहवालात म्हटले आहे की, जर पाकिस्तानने या दायित्वात चूक केली तर त्याला 'विघटनकारी परिणामांना' सामोरे जावे लागेल. येत्या तीन वर्षांत पाकिस्तानला चिनी वित्तीय संस्था आणि सौदी अरेबियाला मोठी रक्कम परत द्यावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT