Pakistan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानची कडक कारवाई

Pakistan: जर परदेशी नागरिकांनी स्वतः देश सोडले नाहीत तर काळजीवाहू सरकार त्यांची टप्प्याटप्प्याने हकालपट्टी करण्यास सुरवात करेल.

दैनिक गोमन्तक

Pakistan: जागतिक पातळीवर पाकिस्तान सातत्याने चर्चेत राहणारा देश आहे. आता पाकिस्तानमधील बेकायदेशीर स्थलांतरिताविषयी घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान चर्चेत आहे.

पाकिस्तानमधील17 लाख अफगाण नागरिकांसह सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना पाकिस्तान सोडण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, अंतरिम गृहमंत्री सरफराज बुग्ती यांनी सांगितले की जर परदेशी नागरिकांनी स्वतः देश सोडले नाहीत तर काळजीवाहू सरकार त्यांची टप्प्याटप्प्याने हकालपट्टी करण्यास सुरवात करेल.

पाकिस्तानने या महिन्यात बेकायदेशीर स्थलांतरितांना देश सोडण्यासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत जाहीर केली होती. यासाठी पाकिस्तान अफगाणिस्तानातून येणाऱ्या लोकांना लक्ष्य करत आहे. अफगाणिस्ताना( Afghanistan) तून सर्वाधिक अवैध स्थलांतरित पाकिस्तानात आले असून त्यांची संख्या १७ लाख आहे.

1 नोव्हेंबरनंतर सरकार टप्प्याटप्प्याने परदेशी लोकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू करेल.' अंतरिम गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले की बेकायदेशीर परदेशी नागरिकांना टप्प्याटप्प्याने हद्दपार केले जाईल आणि पहिल्या टप्प्यात ज्यांच्याकडे प्रवासाची कोणतीही कागदपत्रे नाहीत त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल.

बेकायदेशीर स्थलांतरितांना सरकारने स्थापन केलेल्या तात्पुरत्या केंद्रांमध्ये नेले जाईल. यातील अनेक स्थलांतरित अनेक वर्षांपासून पाकिस्ताना( Pakistan )त राहत आहेत. बुगती म्हणाले, 'सरकारने जिओ-मॅपिंगचे काम पूर्ण केले आहे आणि जेथे बेकायदेशीर परदेशी नागरिक असतील तेथे त्यांचा शोध घेतला जाईल.'

मुदत संपल्यानंतर अवैध स्थलांतरितांना ठेवण्यासाठी केंद्रे सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT