Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Arrest Case: पाकिस्तान SC चा मोठा निर्णय, इम्रान खान यांच्या सुटकेचा दिला आदेश; 'मला लाठ्या-काठ्यांनी...'

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे

Manish Jadhav

Imran Khan Arrest Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधानांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच इम्रान यांना शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अटकेदरम्यान आपल्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे इम्रान यांनी न्यायालयात सांगितले.

इस्लामाबाद उच्च न्यायालयातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान यांची लवकरच सुटका होऊ शकते.

दरम्यान, दुपारी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (एनएबी) इम्रान यांची अटक बेकायदेशीर ठरवत तात्काळ हजर करण्याचे आदेश दिले होते.

एनएबी माजी पंतप्रधानांसह सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचले तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले की, 'तुम्हाला पाहून आनंद झाला.' कोर्ट रुम नंबर एकमध्ये सुनावणी पार पडली.

तासाभरात हजर राहण्याचे आदेश दिले

सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (एनएबी) इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाने म्हटले की, एजन्सीने बेकायदेशीरपणे कॅम्पसमध्ये प्रवेश केला आणि रजिस्ट्रारच्या परवानगीशिवाय इम्रान यांना अटक केली. हा त्यांचा अपमान आहे.

तसेच, भविष्यासाठी आदर्श ठेवण्याची हीच वेळ असल्याचे न्यायालयाने म्हटले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ही टिप्पणी केली.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरु होती.

आत्मसमर्पण केल्यानंतर अटक करण्यात अर्थ काय?

सुनावणीदरम्यान 70 वर्षीय इम्रान खान (Imran Khan) यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

न्यायालयाने म्हटले की, जर 90 लोक आवारात घुसले तर न्यायालयाच्या प्रतिष्ठेचं काय? एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून अटक कशी केली जाऊ शकते?

यापूर्वीही वकिलांवर कोर्टात तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने न्यायालयात आत्मसमर्पण केले असेल तर त्याला अटक करण्यात काय अर्थ आहे?

दरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) न्यायालयाचा अवमान केला आहे. अटक करण्यापूर्वी त्यांनी न्यायालयाच्या निबंधकांची परवानगी घ्यायला हवी होती. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.

मंत्री मरियम म्हणाल्या - त्यांची सुटका केल्यास देश पेटेल

पाकिस्तान सरकारमधील मंत्री मरियम औरंगजेब यांनी इम्रान यांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टिप्पणीवर वादग्रस्त वक्तव्य केले.

त्यांनी म्हटले की, 'इम्रान यांची सुटका झाली तर देशाला कोण वाचवणार? त्यांची अटक कायद्याच्या कक्षेत करण्यात आली आहे. इम्रान यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा परिस्थितीत इम्रान यांची सुटका झाली तर देश पेटेल.'

10 मे रोजी उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली

इम्रान खान यांना सुरक्षा दलांनी 10 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली होती. त्यांच्यावर 50 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

हा घोटाळा अल-कादिर ट्रस्ट विद्यापीठाशी संबंधित आहे. बुधवारी, हिंसाचाराच्या दरम्यान, इम्रान यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना आठ दिवसांसाठी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या कोठडीत पाठवण्यात आले.

आता पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. दुसरीकडे, इम्रान खान यांचे निकवर्तीय शाह मेहमूद कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली.

पंजाबमध्ये एक हजाराहून अधिक लोकांना अटक

पाकिस्तानमधील हिंसाचार पाहता गृह मंत्रालयाने इंटरनेटवर बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी देशभरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

देशभरात शेकडो पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत, तर पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये सुमारे 1,000 लोकांना अटक करण्यात आली आहे. शांतता राखण्यासाठी लष्कराला तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT