Imran Khan: एका तासात इम्रान खान यांना कोर्टात हजर करा; पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश

कोर्टातून बाहेर नेलातच कसे? कोर्टाचा सवाल
Imran Khan | Pakistan Supreme Court
Imran Khan | Pakistan Supreme Court Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Supreme Court on Imran Khan arrest: अल कादिर ट्रस्ट घोटाळ्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या अर्जावर सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी पोलिसांना खडसावले.

इम्रान खान यांना एका तासात आमच्यासमोर हजर करा. तुम्ही कोर्टातून एखाद्याला कसे उचलू शकता. हा न्यायालयाचा अवमान आहे, अशा शब्दांत कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

Imran Khan | Pakistan Supreme Court
Pakistan Protest Video: रस्त्यावर पोलिसांना मारहाण, AK-47 मधून होतोय गोळ्यांचा वर्षाव; PAK मध्ये जमावाचा नंगानाच

दरम्यान, पाकिस्तानमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, सिंध प्रांत वगळता पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांना रात्री उशिरा आणि शाह महमूद कुरेशी यांना गुरुवारी सकाळी हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

पोलिसांनी आतापर्यंत इम्रान यांच्या पक्षाचे सुमारे 1900 नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

9 मे रोजी इम्रानला अटक झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 290 लोक जखमी झाले आहेत. बुधवारी इम्रान खान यांना 8 दिवसांच्या रिमांडवर नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) मध्ये पाठवण्यात आले.

हिंसाचारावर लष्कराने म्हटले आहे की, '9 मेचा दिवस पाकिस्तानच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून पाहिला जाईल.'

कराचीमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले - 9 मे हा पाकिस्तानच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस आहे. कोणत्याही राजकारण्याला अटक होणे हे देशाचे मोठे नुकसान आहे.

पीटीआयने देशभरात सुरू असलेली हिंसक निदर्शने संपवून कायद्याचे पालन केले पाहिजे. जे व्हायचे होते ते झाले, आता त्यांनी हे प्रकरण वाढवू नये. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतील.

Imran Khan | Pakistan Supreme Court
Imran Khan Net Worth: कंगाल PAK चा करोडपती PM, इम्रान यांच्या संपत्तीबद्दल जाणून तुम्हीही म्हणाल...

पीटीआय समर्थकांनी पेशावरमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर हल्ला केला. चांग भागातील आण्विक केंद्रावर कमांडो तैनात आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

पीएम शाहबाज शरीफ म्हणाले, इम्रान आणि पीटीआयने देशाचे मोठे नुकसान केले आहे. दहशतवाद्यांप्रमाणे लष्करी तळांवर हल्ले केले. हे 75 वर्षात कधीच घडले नाही. दरम्यान, बुधवारी इम्रान खान यांच्या समर्थकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लाहोरमधील घरावर हल्ला केला.

500 हून अधिक आंदोलकांनी शरीफ यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. तसेच घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस तेथे पोहोचताच आंदोलकांनी तेथून पळ काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com