पाकिस्तान आणि चीन Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तान पुरवतो चीनला शस्त्रे!

चीनने अमेरिकेला मागे टाकून पाकिस्तानला सर्वात मोठा शस्त्रास्त्र (Weapons) पुरवठादार म्हणून देश आहे.

दैनिक गोमन्तक

शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. या म्हणीप्रमाणे पाकिस्तान आणि चीनचे (Pakistan and China) संबंध अगदी तंतोतंत जुळून येतात. गेल्या काही वर्षांत हे दोन्ही देश जणू 'मित्र' असल्यासारखे एकमेकांच्या जवळ आले. परंतु या मैत्रीवर तज्ज्ञांनी नेहमीच शंका घेतली होती. या मैत्रीवर गोडपणाचा पदर असला तरी आत दडलेला केवळ धूर्तपणा, संसाधनांची लूट, पोकळ आश्वासने आणि चिनी मुत्सद्देगिरी आहे हे यातून दिसून येते. कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party) नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (PRC) ला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी पाकिस्तान होता.

चीन आणि अमेरिका (America) यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात देशाचा लष्करी हुकूमशहा याह्या खान यांनी भूमिका बजावली आहे. तेव्हापासून, काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांवर UNSC ठराव रोखणे या संवेदनशील भू-राजकीय बाबींवर चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश समर्थन करत आहेत. तसेच तिबेट आणि तैवानवर चीनच्या प्रादेशिक दाव्यांचे पाकिस्तान समर्थन करत आहे. पाकिस्तान चीनला इतर मुस्लिम देशांशी जोडण्यासाठी महत्त्वाचे काम करतो. परंतु अलीकडील काही दिवसामध्ये शिनजियांगच्या मुस्लिमांचा विसर पडला आहे.

चीनला पाकिस्तान महत्त्वाचा?

57 सदस्य राष्ट्रांचा (nations) समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) मध्ये चीनविरोधी काही बाबींना पाकिस्तान विरोध करतो. त्या बदल्यात चीन देशाला मोठी आर्थिक मदत आणि संरक्षण देत आहे. चीनने आपला हिस्सा 13 टक्क्यांवरून 63 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आता चीनने अमेरिकेला मागे टाकून पाकिस्तानला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून देश आहे. याच अर्थ पाकिस्तानात आता अमेरिकेपेक्षा जास्त शस्त्रे चीनकडून येतात. 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन पाकिस्तानातील अबोटाबाद येथे सापडल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामधील संबंध बिघडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT