सिनेमाद्वारे भारत-चीन एकत्र येणे शक्य

भारत आणि चीन देशांमध्ये सध्या राजनैतिक संबंधात कटुता निर्माण झालेली आहे.
India and China can come together through cinema
India and China can come together through cinema Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारत आणि चीन देशांमध्ये सध्या राजनैतिक संबंधात कटुता निर्माण झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील सिने महोत्सवात चिनी सिनेमाची निवड होणे ही भारताची सौहार्दताच आहे. कलेमुळे जग जवळ येते ही बाब यातून प्रकर्षाने अधोरेखित होते. सिनेमाच्या (Films) माध्यमातून भारत आणि चीन एकत्र येतील असा विश्‍वास ‘इंडिया चायना फिल्म सोसायटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर जवडे यांनी व्यक्त केला. इफ्फीमध्ये आज सोमवारी प्रदर्शित झालेल्या ‘हे यि फेई झियांग’ (पॅटीओ ऑफ इल्युजन) या सिनेमाचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी या नात्याने ते ‘गोमन्तक’शी बोलत होते.

व्यवसायाने संगीतकार असलेले किशोर जवडे हे गेल्या काही वर्षांपासून भारतात चीनच्या सिनेमांना आणि चीनमध्ये भारतीय सिनेमाचा प्रेक्षक वाढावा यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. याकरिता त्यांनी इंडिया चायना फिल्म सोसायटीची स्थापना केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते दोन्ही देशातील सिनेजगतात सक्रिय आहेत. इफ्फीमध्ये जवडे वर्ल्ड पॅनोरमाचा भाग असलेल्या ‘हे यि फेई झियांग’ या चिनी सिनेमाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ‘घर’ संकल्पनेभोवती फिरणाऱ्या या सिनेमात एका महाविद्यालयीन युवकाची गोष्ट सांगितली आहे. घराच्या शोधात तुम्ही किती दूर जाऊ शकता? असा प्रश्न हा सिनेमा विचारतो. याबाबत किशोर म्हणाले, की भारत आणि चीन यांच्यातील सद्यस्थितीतील संबंधाच्या पार्श्वभूमीवर इफ्फी आणि ब्रिक्स सिने महोत्सवात चीनच्या सिनेमांना निवडणे, त्यांना अधिकृतरित्या बोलावणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

India and China can come together through cinema
गोव्यातील 'हे' पाच चित्रपट इफ्फीच्या मंचावर

आमच्या संस्थेसाठीदेखील महत्त्वाची बाब आहे. कारण या दोन देशांत सांस्कृतिक संबंध सुदृढ व्हावेत अशीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्या देशातील उत्तमोत्तम सिनेमे आम्ही चीनमध्ये प्रदर्शित कसे होतील ते बघतो आणि चीनमधील निवडक सिनेमांना भारतात घेऊन येतो. चीनमध्ये प्रसिद्ध असलेल्या गोल्डन रोस्टर सिने महोत्सवात ‘रेड’ या हिंदी सिनेमासाठी अजय देवगन याला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे इतरही विविध भारतीय सिनेमे आम्ही चीनमधील विविध सिने महोत्सवात प्रदर्शित करत असतो. यावर्षी चीनमध्ये होत असलेल्या सिने महोत्सवात आम्ही ‘मारा’ हा तमिळ सिनेमा पाठवला आहे.

मुंबईतील चायनीज सिने महोत्सवाला प्रतिसाद

मुंबईत मोठ्या प्रमाणात चिनी नागरिक वर्षानुवर्षे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सातत्याने निवडक चिनी सिनेमांचा समावेश असलेल्या सिने महोत्सवाचे यशस्वी आयोजन करत आहोत. याच धर्तीवर चीनमधील विविध सिने महोत्सवातही आम्ही भारतीय सिनेमांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे किशोर यांनी सांगितले.

भविष्यात आम्ही भारतीय आणि चिनी कलाकारांना घेऊन दोन्ही देशाच्या संयुक्त विद्यमाने एका उत्तम सिनेमाची आखणी करत आहोत. यामुळे दोन्ही देशामध्ये सहचर आणि बंधुभाव वाढू शकेल अशी आम्हाला आशा आहे.

- किशोर जवडे, अधिकारी, इंडिया-चायना फिल्म सोसायटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com