Pakistan SSU: पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेवरुन मोठा विवाद चालू आहे. चीनचे नागरिक पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षित नसल्याचे म्हटले जात होते. हा विवाद थांबवण्यासाठी पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
शहबाज सरकारने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांत चीनच्या नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी सुरक्षा दलाच्या 1500 पोलिसांना तैनात केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे नागरिक खैबर पख्तूनख्वा प्रातांत विविध योजनांवर काम करत आहेत.
स्पेशल सिक्युरिटी युनिटशिवाय जिल्हा पोलिस, एलिट फोर्स, फ्रंटियर रिजर्व पोलिसदलातील पोलिस कर्मचाऱ्यांची चीनचे नागरिक आणि ते करत असलेले कामाचे संरक्षण करण्यासाठी नियुक्ती केली आहे. अशी माहिती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या विकासात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सर्वांना सुरक्षा देण्यात येईल असे पोलिस महानिरिक्षक अख्तर हयात खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांत दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षी या भागात 495 दहशतवादी हल्ले झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.पाकिस्तानच्या शहबाज सरकारच्या मंत्रीमंडळातील राणासनाउल्लाह यांनी सर्व स्थानिक आणि विदेशी नागरिकांना सुरक्षा देण्यात येईल असे म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.