Pakistan-Russia-Ukraine: रशिया-युक्रेनमध्ये दीड वर्षाहून अधिक काळ चालू असलेले युद्ध अद्याप थांबलेले नसून या दोन्ही देशांमधील शत्रुत्व दररोज वाढत असल्याचे चित्र जगासमोर उभे राहिले आहे. संपूर्ण जग रशिया-युक्रेनमधील हे युद्ध थांबण्याची वाट पाहण्यात आहे मात्र दररोज यात भर पडताना दिसत आहे.
आता पाकिस्तानमध्ये झालेल्या एका घटनेने रशिया आणि युक्रेनमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, यूक्रेनचे विदेश मंत्री दिमित्री कुलेबा पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावन भुट्टो यांच्याशी चर्चा झाल्यानंतर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषेदत कोणताही रशियन पत्रकाराच्या उपस्थितीला युक्रेनने नकार दिला होता.
दरम्यान, उपस्थित असलेल्या रशियन पत्रकाराला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बाहेर जाण्यास सांगितले होते. या पत्रकाराने इस्लामाबादमधील रशियन दूतावासासमोर झालेला प्रसंग कथन केल्यानंतर रशियाचे दूतावासाने यावर अॅक्शन घेतली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल रशियाने पाकिस्तान सरकारकडे उत्तर मागितले आहे.
दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यानी दिलेली पाकिस्तानला दिलेली ही भेट ऐतिहासिक मानली जात आहे. 1993मध्ये पाकिस्तान आणि युक्रेनमध्ये स्थापन केलेल्या राजनैतिक संबंधानंतर युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्याची ही पहिलीच भेट ठरली आहे.
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्याच्या पाकिस्तान भेटीवर रशिया आधीच नाराज असल्याचे म्हटले जात होते. पाकिस्तानने रशियन आणि युक्रेन या दोन्ही देशामध्ये असलेल्या संबंधामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला मात्र आता या घटनेने रशियाची नाराजी पाकिस्तानने ओढवून घेतल्याचे म्हटले जात आहे.
रशियाने पाकिस्तानने रशियाच्या पत्रकारासोबत केलेल्या व्यवहाराबाबत मागितलेल्या उत्तरानंतर पाकिस्तानने रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवण्यासाठी आपण भूमिका घेऊ शकत असल्याचे म्हटले आहे.
दीड वर्षाहून अधिक काळ चाललेले हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यवर्ती भूमिका निभावण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानकडून करण्यात आले आहे.
याबरोबरच रशिया आणि युक्रेनसोबत आमची एक सारखीच मैत्री असल्याचेदेखील पाकिस्तानने आपल्याअधिकृत वक्तव्यांमध्ये म्हटले आहे. जे काम चीन( China), तुर्कीसारखे देश करु शकले नाहीत ते काम पाकिस्तान कसे करणार असा प्रश्न जगभरातून उपस्थित केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.