India- Pakistan Fight Over POK: पाकिस्तानला मिळाले नवे बाहुले! मी काश्मिरची मुलगी म्हणत यासिन मलिकच्या मुलीची मोठी मागणी

India- Pakistan Fight Over POK: काश्मिरच्या लढाईला माझ्या वडीलांच्या रुपाने एक नवीन प्रकाश मिळाला आहे.
India- Pakistan Fight Over POK
India- Pakistan Fight Over POKDainik Gomantak
Published on
Updated on

India- Pakistan Fight Over POK: भारत- पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून या दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरुन वाद असल्याचे दिसून येत आहे. पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असला तरीही या मुद्द्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात यश मिळाले नाही. आता यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे

आता पीओके मधील यासिन मलीकच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पाठीमागे पाकिस्तान तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. 'मी रझिया सुलतान, काश्मीरची मुलगी, मी यासिन मलिकची मुलगी' असे म्हणत तिने पाकव्याप्त काश्मिरमधील मुजफ्फराबाद मधील क्षेत्रीय विधान सभेला संबोधित करताना काश्मिरच्या लढाईला माझ्या वडीलांच्या रुपाने एक नवीन प्रकाश मिळाला आहे.

माझ्या वडीलांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आले असून त्यांची या आरोपातून मुक्तता व्हावी, मला त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवता यावा यासाठी त्यांचा जामीन मंजूर करावा अशी मागणी रझियाने केली आहे. काश्मिरच्या लढाईत माझ्या वडीलांनी संपत्ती, मालमत्ता आणि कुटुंब सगळे पणाला लावल्याचेही तिने यावेळी म्हटले आहे.

रझिया सुलतानच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर प्रोफेसर सज्जाद राजा यांनी ट्विट करत काश्मिरला पाकिस्तानमध्ये सामील करण्याचा पाकिस्तानच्या धोरणांचा हा भाग असल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणतात- यासिन मलिकच्या लग्नापाठीमागे मोठा प्लॅन होता.

जम्मू-काश्मिरमध्ये 3.5 मिलियन महिला आहेत मात्र यासिन मलिकने पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सीमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी महिलेसोबत लग्न केले. आता पुढच्या 60-70 वर्षापर्यंत पाकिस्तानच्या काश्मिर बनणार पाकिस्तान या धोरणासाठी ही काश्मीरची मुलगी बाहुले म्हणून मिळाली आहे.

मकबूल भट्टच्या मुलासारखेच पाकिस्तानच्या या प्रयत्नांना देखील अपयश येणार आहे. सत्य नेहमीच समोर येते. जम्मू काश्मिरमध्ये कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन किंवा थारा मिळणार नाही. पाकिस्तानचे सगळे प्लॅन अपयशी होतील. जम्मू काश्मिरचे लोक आता कंटाळले आहेत.

India- Pakistan Fight Over POK
Points of Light' Award: भारतीय वंशाच्या सात वर्षीय मुलीला ‘पॉइंट्स ऑफ लाइट’ पुरस्कार, ब्रिटिश उपपंतप्रधानांनी केला गौरव

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2019मध्ये दहशतवादी विरोधी कायदा आणि भारताविरुद्ध केलेल्या कृत्यामुळे यासीम मलिकने अटक केली होती. 2022 मध्ये यासिन मलिकला अजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे. आता त्याच्या मुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर या प्रकरणाच्या पाठीमागे पाकिस्तान आहे का हे पाहणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com