Pakistan represent Jammu Kashmir Issue in CICA Kazakhstan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानने पुन्हा आवळला जम्मू काश्मीरचा राग तर परराष्ट्र मंत्र्यांचं सडेतोड उत्तर

दैनिक गोमन्तक

काश्मीरच्या (Jammu Kashmir) मुद्द्यावर सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सगळ्या गोष्टी स्पष्ट असूनही पाकिस्तान (Pakistan) आपल्या कुरघोड्या थांबवत नाहीये. प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान हा मुद्दा उठवताना दिसत आहे. आता नुकत्याच कझाकिस्तानमध्ये (Kazakhstan) झालेल्या संवाद आणि आत्मविश्वास वाढीच्या उपायांवर झालेल्या परिषदेच्या (CICA) परराष्ट्र मंत्र्यांच्या सहाव्या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे .(Pakistan represent Jammu Kashmir Issue in CICA Kazakhstan)

जगाच्या भयावह दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि अफगाणिस्तानात तालिबानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानने दक्षिण आशियात कायमस्वरूपी शांततेचा नारा दिला आहे आणि त्याला काश्मीरशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. CICA च्या बैठकीत आपल्या व्हिडिओ संदेशात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय दक्षिण आशियात कायमची शांतता शक्य नाही.

विशेष म्हणजे पाकिस्तान सतत जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने काश्मीरच्या मोठ्या भागावर बेकायदेशीरपणे कब्जा देखील केला आहे आणि जगासमोर भारताविरुद्ध द्वेष पसरवत आहे . जम्मू -काश्मीर हा त्याचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानला गुलाम काश्मीर रिकामे करावे लागेल असे भारताने एकदा नव्हे तर अनेक वेळा खडसावून सांगितले आहे .

दरम्यान याच बैठकीत एका दुसऱ्या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमापार दहशतवादाबद्दल पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ' अतिरेकी, कट्टरता आणि हिंसा या शक्ती आणि त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांना मागे टाकण्यासाठी परत येतात.' आपल्या भाषणादरम्यान हे विधान जारी केले.त्याचबरोबर त्यांनी सीआयसीएच्या सदस्यांसाठी शांतता आणि विकासाच्या समान ध्येयाचा दहशतवाद हा "सर्वात मोठा शत्रू" असल्याचे म्हटले आहे, सीआयसीए आशियातील सुरक्षा आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्यासाठी बहुराष्ट्रीय मंच आहे. त्याची स्थापना 1999 मध्ये कझाकिस्तानच्या नेतृत्वाखाली झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT