Fawad Chaudhary Arrested:  Dainik Gomantak
ग्लोबल

Fawad Chaudhary Arrested: पाकिस्तानचे माजी मंत्री अन् पीटीआय नेते फवाद चौधरी यांना अटक

शाहबाज शरीफ सरकार लवकरच इम्रान खान यांना अटक करू शकते, अशी भीती पीटीआयने व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Fawad Chaudhary Arrested: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री आणि पीटीआयचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, इम्रान खानलाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. फवाद चौधरीच्या अटकेनंतर इम्रान खान यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी यापूर्वी दावा केला होता की, शेहबाज शरीफ यांचे सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचा विचार करत आहे.

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांना अटक

इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे नेते फारुख हबीब यांनी 25 जानेवारीला सकाळी फवाद चौधरीच्या अटकेबाबत माहिती दिली. पीटीआयचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्याचा कट रचल्याबद्दल त्यांनी जाहीरपणे सरकारचा निषेध केल्यानंतर फवाद चौधरी यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शाहबाज शरीफ यांचे सरकार आज रात्री इम्रानला अटक करण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती पीटीआयने व्यक्त केली आहे.

  • फवादवर गुन्हा दाखल करण्यात आला

इस्लामाबाद पोलिसांनी पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरीच्या अटकेला मान्यता दिली आहे. इस्लामाबाद पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटीआय नेत्याला लाहोरमधील ठोकर नियाज बेगजवळील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

निवडणूक आयोगाचे सचिव उमर हमीद यांच्या तक्रारीवरून फवाद चौधरीविरुद्ध मंगळवारी रात्री इस्लामाबादमधील कोहसार पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या अनेक नेत्यांनी फवाद चौधरीच्या अटकेचा तीव्र निषेध केला आहे.

  • इम्रान खानलाही अटक होऊ शकते

इम्रान खानच्या (Imran Khan) अटकेची शक्याता असल्याने पीटीआय समर्थक त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेची अफवा बुधवारी पहाटे पसरली. लाहोरच्या जमान पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले. पाकिस्तानमध्ये कायदा नावाचा काहीही उरलेला नाही, असा आरोप पीटीआय नेत्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

Omkar Elephant: भल्यामोठ्या 'ओंकार' हत्तीला कसे परतवले सिंधुदुर्गात? पहा Video

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

SCROLL FOR NEXT