PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

G20 Summit Srinagar 2023: पाकिस्तानचा पुन्हा तिळपापड, श्रीनगरमध्ये होणाऱ्या G-20 कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी...

Srinagar G20 Meeting: श्रीनगरमध्ये या महिन्यात होणाऱ्या G-20 कार्यक्रमामुळे पाकिस्तान चिंतेत आहे.

Manish Jadhav

G20 Summit Srinagar 2023: श्रीनगरमध्ये या महिन्यात होणाऱ्या G-20 कार्यक्रमामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. एकीकडे पाकिस्तान जगभरातील देशांना पत्र लिहून या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी प्रवृत्त करत ​​आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून.

भारताविरोधात G20 विरोधी हॅशटॅग तयार करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, ज्यामुळे भारताच्या वाढत्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जातील.

दरम्यान, या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ 2 मे ते 7 मे या कालावधीत ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान शरीफ या महिन्यात 6 मे रोजी होणाऱ्या किंग चार्ल्स III च्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडनला जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) या दौऱ्यात ब्रिटनसमोर श्रीनगरमध्ये होणाऱ्या G20 कार्यक्रमाचा मुद्दाही उपस्थित करणार असून या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी ब्रिटन सरकारची मदत घेणार आहेत.

G20 च्या पर्यटन कार्यगटाची बैठक होणार

22 ते 24 मे दरम्यान श्रीनगरमध्ये G20 च्या पर्यटन कार्यगटाची बैठक होणार आहे. ऑगस्ट 2019 नंतर ही पहिली मोठी आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बैठक असेल.

या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीत जम्मू-काश्मीरला प्रोत्साहन देण्यावर भर असेल. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्र मंत्रालय जगातील अनेक देशांशी संपर्क साधत आहे आणि त्यांना श्रीनगरमध्ये होणाऱ्या जी-20 बैठकीत सहभागी न होण्यास सांगत आहे.

तसेच, 17 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला असेच एक पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये काश्मीरबाबत भारताविरोधात अनेक हास्यास्पद बोलले गेले आहेत.

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी बांगलादेशला पाठवलेल्या दस्तऐवजात काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरु असून पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशनेही G20 वर बहिष्कार टाकावा, असे म्हटले आहे.

दुसरीकडे, श्रीनगर येथे होणाऱ्या G20 च्या विरोधात पाकिस्तानने राजनैतिक स्तरावर आपले प्रयत्न तीव्र केले आहेत.

जगभरातील आपल्या उच्चायुक्त आणि दूतावासांमार्फत ते सर्व देशांना पत्रे लिहून त्यांना भारताविरुद्ध वक्तव्ये करण्यास प्रवृत्त करत आहेत.

तसं पाहिलं तर भूतकाळात जम्मूच्या पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानची आयएसआय असल्याचं समजतं. जगाचे लक्ष काश्मीरकडे वेधण्यासाठी आयएसआय दहशतवादी हल्ले करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT