Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economy Crisis: "मुनीर अन् मी पैसे मागतो तेव्हा..." शहबाज शरीफ यांनी मांडली आर्थिक गुलामगिरीची व्यथा; परकीय कर्जाच्या अटींपुढे झुकला पाकड्यांचा कणा

Pakistan PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या देशाच्या आर्थिक दुरवस्थेबद्दल अत्यंत खेद व्यक्त करतानाच जागतिक स्तरावर हतबलता जाहीर केली.

Manish Jadhav

Pakistan Economy Crisis: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या देशाच्या आर्थिक दुरवस्थेबद्दल अत्यंत खेद व्यक्त करतानाच जागतिक स्तरावर हतबलता जाहीर केली. जगभरात फिरुन आपल्या देशासाठी कर्जाची भीक मागावी लागते, तेव्हा आपल्याला प्रचंड लाज आणि शरम वाटते, अशी कबुली शरीफ यांनी दिली.

इस्लामाबादमध्ये देशातील मोठे निर्यातदार आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या आत्मसन्मानाला बसणाऱ्या तडाख्याबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासोबत परदेशात जाऊन मदतीचा हात पसरणे हे देशाच्या सन्मानासाठी क्लेशदायक असल्याचे त्यांनी मान्य केले.

ए1 टीव्ही या स्थानिक वाहिनीशी बोलताना शहबाज शरीफ म्हणाले की, जेव्हा आपण दुसऱ्या देशांकडे पैसे मागतो, तेव्हा आपला स्वाभिमान पणाला लागलेला असतो. कर्जाचा हा डोंगर पाकिस्तानच्या प्रतिष्ठेवर जड झाला असून आम्हाला आमची मान खाली घालावी लागते. इतकेच नाही तर, कर्ज देणाऱ्यांच्या अशा अनेक अटी किंवा गोष्टी ज्या आम्हाला मान्य नसतात, त्यांनाही आम्ही नाकारु शकत नाही; कारण आपण त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहोत.

पाकिस्तान (Pakistan) सध्या आपल्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मदतीवर अवलंबून आहे. आधीच कर्जात बुडालेला हा देश आपला गाडा हाकण्यासाठी सतत नवीन कर्जाच्या शोधात आहे, ही वस्तुस्थिती शरीफ यांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली.यावेळी पंतप्रधानांनी चीन आणि अरब राष्ट्रांचे मनापासून आभार मानले.

चीनला (China) पाकिस्तानचा 'सदाबहार मित्र' संबोधतानाच त्यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कतर या देशांचा विशेष उल्लेख केला. हे देश संकटकाळात आणि चांगल्या काळातही पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहतात, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी आणि परकीय चलन साठा स्थिर ठेवण्यासाठी हे देश अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांत चीन आणि अरब देशांनी दिलेल्या भरघोस कर्जामुळेच पाकिस्तानचे अस्तित्व टिकून आहे, म्हणूनच पाकिस्तान या देशांच्या कोणत्याही कृतीवर किंवा धोरणांवर कधीही टीका करत नाही. ही आर्थिक गुलामगिरी पाकिस्तानच्या भविष्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

SCROLL FOR NEXT