Imran Khan & Fawad Chaudhry  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: इम्रान खानला मोठा झटका, फवाद चौधरी यांची पक्षाला सोडचिठ्ठी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. यातच आज इम्रान यांना सर्वात मोठा धक्का बसला.

इम्रान यांचे निकवर्तीय आणि त्यांच्या पक्षाचे (तेहरीक-ए-इन्साफ) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी पीटीआय पक्षाचा राजीनामा दिला. इम्रान यांच्या अटकेनंतर 9 मे रोजी उसळलेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला होता.

दरम्यान, फवाद चौधरी हे 2018 मधील इम्रान यांच्या विजयाचे मुख्य शिल्पकार मानले जातात. मी राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असून, इम्रान खान (Imran Khan) यांच्यापासून वेगळे होत असल्याचे ट्विट फवाद चौधरी यांनी केले.

लष्कर आणि सरकार माझ्या लोकांना तुरुंगात टाकत आहे- इम्रान

एकीकडे फवाद चौधरी राजीनामा देत आहेत, तर दुसरीकडे इम्रान खान देशाला संबोधित करत आहेत. सरकार आणि लष्कर माझ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकत असल्याचे इम्रान खान म्हणाले. या लोकांवर पीटीआय सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मी पीटीआयमध्ये नाही, असे कोणी म्हणत असेल तर त्याला सोडले जात आहे, असेही इम्रान म्हणाले.

दुसरीकडे, 9 मे नंतर संपूर्ण पाकिस्तानात उसळलेल्या हिंसाचारामुळे अनेक वरिष्ठ पीटीआय नेत्यांनी इम्रान यांची साथ सोडली आहे. पीटीआयचे नेते एकापाठोपाठ एक पक्षाचा निरोप घेत आहेत. या नेत्यांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे नाव फवाद चौधरी यांचे आहे.

इम्रान सरकारमधील मंत्री

2018 मध्ये, इम्रान सरकारच्या कार्यकाळात, फवाद चौधरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फेडरल मंत्री बनले होते. यानंतर, 14 एप्रिल 2021 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते.

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील केदिना येथे जन्मलेल्या चौधरी यांनी 2012 ते मार्च 2013 दरम्यान पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि राजा परवेझ अश्रफ यांच्या फेडरल मंत्रिमंडळातही काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT