Pakistani MP Tahrir Iqbal Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: 'आम्हाला भारतापासून वाचवा...', पाकिस्तानी खासदाराला कोसळले रडू; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात घबराट

Pakistani MP Tahrir Iqbal: पाकिस्तानी संसदेत बोलताना आणखी एका खासदाराला रडू कोसळले. त्यांच्या रडण्याचा व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने केलेल्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी (7 मे) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला खुली धमकी दिली होती. शरीफ यांनी गंभीर परिणामांचा इशारा दिला होता, परंतु पाकिस्तान किती घाबरला आहे त्याची प्रचिती सातत्याने येत आहे. पाकिस्तानी संसदेत बोलताना आणखी एका खासदाराला रडू कोसळले. त्यांच्या रडण्याचा व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ताहीर इक्बाल असे या खासदाराचे नाव आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये असलेले सुमारे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.

ते पाकिस्तानी सैन्यात मेजर होते

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा व्हिडिओ पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचा आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव ताहिर इक्बाल आहे. ताहिर इक्बाल हे पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे खासदार आहेत. ते पाकिस्तानी सैन्यात मेजरही राहिले आहेत. नंतर राजकारणात आले. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यांनी पर्यावरण मंत्री, काश्मीर व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिले. 2002 ते 2013 पर्यंत त्यांनी चकवालमधून मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. एक अनुभवी राजकारणी असूनही त्यांचे असे रडणे हे दर्शवते की, पाकिस्तानच्या संसदेत आता युद्धाची भीती उघडपणे जाणवत आहे.

काय म्हणाले ताहिर इक्बाल?

ताहिर इक्बाल म्हणाले की, 'मी सर्वांना अशा युद्धजन्य परिस्थिती एकत्र येण्याची विनंती करतो. आता अल्लाहाने या देशाचे रक्षण करो.' ताहिर इक्बाल यांनीही पाकिस्तानच्या सध्याच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ''आम्हाला भारताच्या (India) या लष्करी कारवाईपासून वाचवा. सध्या पाकिस्तान असहाय्य आहे. आपण दोषी आहोत. आपण मोठे गुन्हेगार आहोत.''

पाक सैन्य हाय अलर्टवर

सिंदूर हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षेबाबत धोरणात्मक गोंधळ आणि चिंता पसरली आहे. लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारवर दबाव चालला आहे. तथापि, आर्थिक संकट, अंतर्गत अस्थिरता आणि जागतिक एकाकीपणामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: रुमडामळच्या ४ अपात्र पंच सदस्यांना १६ ऑगस्टपर्यंत स्थगिती

बाथरुममध्ये ढसाढसा रडला होता विराट कोहली; युजवेंद्र चहलने सांगितला वर्ल्ड कपमधील ‘त्या’ पराभवाचा किस्सा!

Nishaanchi: 'दिल थामिऐ, जान बचाइए'! बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये झळकणार; नुसत्या पोस्टरनेच घातलाय धुमाकूळ

Kidney Infection: किडनी इन्फेक्शन म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि बचावात्मक उपाय!

SCROLL FOR NEXT