Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Rain News: नोव्हेंबर महिन्यात वाळंवटीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिक म्हणाले.
Sankhali flood news
Valvanti River Flood in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गोव्यातून मॉन्सून परतला असला तरी राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कहर घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साखळीत झालेल्या पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. साखळीतील वाळंवटी नदी ओव्हरफूल झाली असून, मार्केटमध्ये पाणी घुसले आहे.

अवकाळी पावसाने साखळीला झोडपून काढले आहे. शनिवारी (०१ नोव्हेंबर) सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाळंवटी नदी ओव्हफूल झाली. नदीचे पाणी मुख्य बाजारात घुसल्याने अनेकांची गैरसोय झाली. अखेर बाजारात घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपचा वापर करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात वाळंवटीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिक म्हणाले.

Sankhali flood news
Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाताला आलेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तसेच, इतर पिकांना देखील त्याचा मोठा फटका बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांनी ४० हजार हेक्टरी मदत जाहीर करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आठवडाभर पाऊस नाही; हवामान खाते

राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असला तरी हवामान खात्याने पावसाचा जोर कमी होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात ०१ ते ०७ नोव्हेंबर याकाळात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याकाळात राज्यात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com