Who Is Behind The Killing Of Terrorists Hiding In Pakistan: पाकिस्तानात बसून भारताविरुद्ध कट रचणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतीय सुरक्षा दलांपासून जीव वाचवून पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घराबाहेर पडल्यास आपला जीव जाईल, अशी भीती सतावत आहे.
याच भीतीपोटी दाऊद इब्राहिमपासून ते हाफिज सईदपर्यंत या दहशतवाद्यांनी स्वत:ला भूमिगत केले आहे. अशा स्थितीत सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होत आहे की, पाकिस्तानमध्ये देशाच्या शत्रूंशी सामना करणारा तो कोण आहे?
पाकिस्तानात राहून भारताच्या (India) शत्रूंना कोण मारत आहे? 6 मे रोजी खलिस्तान कमांडो फोर्सचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार परमजीत सिंह पंजवार लाहोरमध्ये मारला गेला.
परमजीत सिंह मॉर्निंग वॉकला जात असताना दोन हल्लेखोर मोटारसायकलवरुन आले आणि त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. परमजीतवर पंजाबमधून अमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा आरोप होता.
या वर्षी 20 फेब्रुवारी रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याला रावळपिंडीतील पॉइंट ब्लॅक येथून एका दुकानासमोर गोळ्या घालण्यात आल्या. पीरवर भारतातील दहशतवादी (Terrorists) कारवायांमध्ये सहभागाचे गुन्हे दाखल होते. पाकव्याप्त काश्मीरमधून भारताविरुद्धच्या दहशतवादी कटात त्याचा सहभाग होता.
अलबदर या दहशतवादी गटाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या सय्यद खालिद रझा याची या वर्षी फेब्रुवारीमध्ये कराचीतील त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
खालिद रझा हा घरातून पार्किंगच्या दिशेने जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. अल बदरचा जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी ओळखला जाणारा दहशतवादी कमांडर सय्यद नूर शालोबर याची पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सय्यद नूर पाकिस्तान आर्मी आणि आयएसआयसाठी काम करायचा.
अनेक लोक याला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था RAW च्या मोहिमेशी जोडत आहेत. मात्र, सरकार किंवा एजन्सीने याबाबत पूर्ण मौन बाळगले आहे.
दुसरीकडे, काही लोकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी एजन्सी आयएसआय स्वतः या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या जागी दहशतवाद्यांची नवीन फळी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुसरीकडे, कारण काहीही असो, पण त्यामुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.