Pakistan Political Crisis: भारताचा शेजारी देश पाकिस्तान हळूहळू आर्थिक संकटाच्या गर्तेत बुडत चालला आहे, पण पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
दरम्यान, पाकिस्तानचे (Pakistan) गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दावा केला आहे की, गुप्तचर यंत्रणांनी फोन टॅपिंगमधील संभाषण उघड केले आहे, जे सूचित करते की इम्रान खानचा पक्ष कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा कट रचत आहे.
सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला की, कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे हे या कारवाईचे उद्दिष्ट आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी त्यांच्या दाव्यात म्हटले आहे की, देशाच्या एजन्सींनी टॅपिंगमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेत्याच्या घरावर छापा टाकला आणि बलात्काराचा खोटा खटला रचण्याचे संभाषण उघड केले आहे.
मात्र, सनाउल्लाह यांनी आपल्या दाव्याच्या बाजूने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी रविवारी सनाउल्ला यांना प्रत्युत्तर दिले. इम्रान म्हणाले की, मंत्री स्पष्टपणे मीडियामध्ये येत असलेल्या बातम्या लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तर, इम्रान पुढे म्हणाले की, या फॅसिस्ट सरकारने महिलांवर जेवढे अत्याचार केले, तेवढे कुणीच केले नाहीत.
9 मेच्या घटनेनंतर इम्रान यांच्या पक्षातील 60 हून अधिक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाचा त्याग करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सरचिटणीस असद उमर, ज्येष्ठ नेते फवाद चौधरी आणि माजी मंत्री शिरीन मजारी यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे, 9 मे रोजी इम्रान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून निमलष्करी दलाच्या जवानांनी अटक केली होती, त्यानंतर देशात हिंसक निदर्शने सुरु झाली.
या अटकेच्या निषेधार्थ, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस, मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीसह डझनभर लष्करी आस्थापनांची तोडफोड केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.