Lawyers Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: "न्यायालय की कुस्तीचा आखाडा?" हायकोर्टातच वकिलांची लाथाबुक्क्यांनी मारहाण; पाकिस्तानातील लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल

Pakistan Lawyers Viral Video: पाकिस्तानमधून सध्या एक अत्यंत लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Pakistan Lawyers Viral Video: पाकिस्तानमधून सध्या एक अत्यंत लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये न्यायाच्या पवित्र मंदिरातच कायद्याचे रक्षक असलेल्या वकिलांनी कायद्याच्या चिंधड्या उडवल्याचे पाहायला मिळत आहे. हे धक्कादायक दृश्य लाहोर उच्च न्यायालयातील असल्याचे सांगितले जात असून यात वकिलांचे दोन गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि चपलांचा मारा असा हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली.

'पाकिस्तान टुडे'च्या रिपोर्टनुसार, लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या निवडणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, वकिलांनी न्यायालयाच्या आवारातच कुस्तीचा आखाडा बनवला. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काळ्या कोटातील वकील एकमेकांना मारहाण करत आहेत. यातील सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे, एक वकील महिला वकीलाला मारहाण करताना दिसत आहे, तर प्रत्युत्तरात त्या महिला वकीलानं रागाच्या भरात पंखा तोडून त्याचं एक पात या वकिलाच्या दिशेनं भिरकावलं. हा सगळा राडा सुरु असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला.

आधीच दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी आणि आर्थिक डबघाईला आल्यामुळे पाकिस्तानची (Pakistan) जगभरात बदनामी झालेली आहे. एवढचं नाहीतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अनेकदा पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरुन मान खाली घालावी लागते. याचदरम्यान उच्च न्यायालयातील या व्हिडिओमुळे पाकिस्तानची उरलीसुरली इभ्रतही वेशीवर टांगली.

"ज्या ठिकाणी सामान्य माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा असते, तिथेच जर अशा प्रकारे गुंडगिरी आणि हाणामारी होत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरलाच कुठे?" असा सवाल नेटीझन्स विचारत आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानमधील न्यायव्यवस्थेची अवस्था किती खालच्या थराला गेली, याचे विदारक दर्शन जगाला घडले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT