Pakistan Bomb Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Bomb Blast Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली.

Manish Jadhav

Bomb Blast Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली. शनिवारच्या (20 जून) दिवशी या भागात झालेल्या दोन लागोपाठच्या भीषण बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण परिसर रक्ताने माखला असून, यात 7 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. या आत्मघाती आणि क्रूर हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी किंवा बंडखोर संघटनेने घेतलेली नाही. हे दोन्ही स्फोट खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यातील मार्का बेरा भागात झाले असून, या घटनेमुळे सीमावर्ती भागात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

बन्नू जिल्ह्याचे पोलीस अधिकारी (DPO) यासिर अफरीदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट रस्त्याच्या कडेला पेरुन ठेवलेल्या आयईडी (IED) मुळे झाला. एक प्रवासी व्हॅन हाथी खेल गावातून बन्नू शहराकडे जात असताना या स्फोटाच्या भयंकर कचाट्यात आली. हा स्फोट इतका तीव्र होता की, यामध्ये व्हॅनचा चक्काचूर झाला आणि 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आजूबाजूचे नागरिक आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी धावून आली.

जखमींना व्हॅनमधून बाहेर काढण्याचे आणि वाचवण्याचे काम सुरु असतानाच, तिथे दुसरा मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. हा दुसरा स्फोट मुद्दामहून मदतकार्यात गुंतलेल्या लोकांना लक्ष्य करण्यासाठी केला गेला. या दुसऱ्या धमाक्यात आणखी दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तसेच घटनास्थळावरील एक वाहनही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये येत संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप दिले. सुरक्षा दलांनी घटनास्थळाची पूर्ण नाकेबंदी केली असून, तिथून स्फोटाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु केले. सर्व मृतदेह आणि गंभीर जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी या घटनेला "अत्यंत दुःखद" आणि "हृदयद्रावक" असे संबोधत मृतांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. प्रांतीय सरकार या कठीण काळात पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडले जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT