Pakistan Khyber Pakhtunkhwa Attacked Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मोठा आत्मघाती हल्ला, पाच चिनी नागरिकांसह 6 जण ठार

Pakistan Khyber Pakhtunkhwa Attacked: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघातकी हल्ला झाला आहे. शांगला जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Pakistan Khyber Pakhtunkhwa Attacked: पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये एक मोठा आत्मघातकी हल्ला झाला आहे. शांगला जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करुन हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. हा आत्मघाती हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा काही तासांपूर्वी बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वामधील शांगलाच्या बिशाम तहसीलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली, त्यानंतर मोठा स्फोट झाला. या घटनेच्या समोर आलेल्या छायाचित्रात स्फोटानंतर एक वाहन खड्ड्यात पडताना दिसत आहे. स्फोटामुळे वाहनाला आग लागली. ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले त्यात अनेक चिनी नागरिक प्रवास करत होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये (Pakistan) चिनी नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत डझनहून अधिक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक हल्ले खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात झाले आहेत.

हल्लेखोरांना मछ तुरुंगात प्रवेश करायचा होता

दुसरीकडे, बलुचिस्तानमधील (Balochistan) हल्ल्याबद्दल बोलायचे झाल्यास, या वर्षातील हा तिसरा मोठा हल्ला होता. या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने घेतली आहे. यापूर्वीचे दोन्ही हल्लेही सुरक्षा दलांनी हाणून पाडले होते. वर्षाच्या सुरुवातीला मछ शहरात सुरक्षा दलांवर हल्ला झाला होता, ज्यात 10 लोक मारले गेले होते. हल्लेखोरांनी तुरुंगात घुसण्याचा प्रयत्न केला होता, तो सुरक्षा दलांनी हाणून पाडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT