Bomb Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Blast in Pakistan: पाकिस्तानचे 'अणु तळ' धोक्यात! 12 शहरात 25 ड्रोन हल्ले; रावळपिंडी-सियालकोटमध्ये नागरिकांची पळापळ

Nuclear Site Drone Strike Pakistan: लाहोर कराचीसह 12 मोठ्या शहरांमध्ये 25 ड्रोन हल्ले झाल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, कराचीमध्ये अणुबॉम्बचे स्टोर आहे.

Manish Jadhav

भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान हादरला असताना आता विविध शहरात ड्रोनद्वारे स्फोट झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाहोर कराचीसह 12 मोठ्या शहरांमध्ये 25 ड्रोन हल्ले झाल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, कराचीमध्ये अणुबॉम्बचे स्टोर आहे. अशा परिस्थितीत कराचीमध्ये ज्या पद्धतीने ड्रोन स्फोट झाला त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कराचीतील बॉम्बस्फोट हा सुरक्षेतील सर्वात मोठी चूकही मानली जात आहे.

आतापर्यंत 12 शहरांमध्ये हल्ले

पाकिस्तानातील (Pakistan) कराची, गुजरांवाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी येथे ड्रोन हल्ले झाले. ड्रोन हल्ल्यामुळे या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. हे ड्रोन कुठून आले याबद्दल पाकिस्तानने अद्याप काहीही सांगितलेले नाही. तसेच, ड्रोन हल्ल्याची जबाबदारीही अद्याप कोणीही घेतलेली नाही. या 5 शहरांव्यतिरिक्त, उमरकोटमध्येही ड्रोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. लाहोरमध्ये सर्वाधिक 3 ड्रोन स्फोट झाले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण 12 शहरांमध्ये हे स्फोट झाले आहेत. रावळपिंडी, सियालकोटमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली

दरम्यान, या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, बुधवारी (7 मे) पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. शाहबाज म्हणाले होते की, 'पाकिस्तानी हवाई दल खंबीरपणे या युद्धजन्य परिस्थिती लढत आहे.' पंतप्रधानांच्या कौतुकानंतर लगेचच, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी हवाई दल प्रमुखांची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Weekly Horoscope: ऑगस्टचा हा आठवडा ठरणार 'लकी', 'या' 4 राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक स्थितीत होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT