Pakistan International Airlines Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan International Airlines: दर वर्षी कोट्यवधींचं नुकसान, कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाकिस्तान विकणार 'एअरलाइन्स'

Pakistan: पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करत आहे. पाकिस्तानी लोक दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत.

Manish Jadhav

Pakistan Interim Government Seals Plan To Privatise Pakistan International Airlines: पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करत आहे. पाकिस्तानी लोक दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत. यातच आता, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) प्रायव्हेट हातात देण्याची तयारी सुरु आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद हसन फवाद (Privatisation Minister Fawad Hasan Fawad) यांनी ही माहिती दिली. फवाद म्हणाले की, त्यांचे सरकार पीआयएचे खाजगीकरण करण्याची योजना तयार करत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत झालेल्या करारानुसार तत्कालीन शहबाज शरीफ सरकारने सरकारी मालकीच्या उद्योगांमध्ये सुधारणा करण्यास सहमती दर्शवली होती. त्यानंतर काही दिवसांनीच सरकारने PIA चे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

98 टक्के काम पूर्ण झाले

फवाद हसन यांना पीआयए विकण्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, आमचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन टक्के रक्कम मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर एक्सेल शीटवर आणावी लागेल. हा स्टेक टेंडरद्वारे विकायचा की सरकार-टू-सरकार डील करायचा याचा निर्णय मंत्रिमंडळ घेईल, असे हसन म्हणाले. निवडणुकीनंतर ट्रांजेक्शन अॅडवाइजर अर्न्स्ट अँड यंग यांनी तयार केलेला आराखडा मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

'आता मागे वळून पाहण्याची गरज नाही’

फवाद हसन म्हणाले की, आम्ही गेल्या चार महिन्यांत जे केले, ते मागील सरकारे दशकाहून अधिक काळ करण्याचा प्रयत्न करत होते. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 51 टक्के हिस्सेदारी विमान कंपन्यांच्या खरेदीदारांना विकली जाईल.

पीआयएवर 785 अब्ज रुपयांचे कर्ज

दरम्यान, पीआयएवर 785 अब्ज रुपयांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे, सुमारे 713 अब्ज रुपयांची संचित तूट आहे. त्याचवेळी, 2023 मध्ये तूट 112 अब्ज रुपये राहण्याची शक्यता आहे. सरकारने PIA विकण्यासाठी 2016 च्या कायद्यातही सुधारणा केली आहे. या कायद्यात जास्त शेअर्स विकण्यावर बंदी होती. माजी अर्थमंत्री इशाक दार म्हणाले की, पीआयएच्या विक्रीची प्रक्रिया वेगाने होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाच्या बदल्यात, बँकांना कागदावर 16.5 टक्के कूपन असलेले 5 वर्षांचे बाँड जारी करायचे होते, तर वित्त मंत्रालय फक्त 10 टक्के ऑफर करत होते. मात्र, याबाबत बँकांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पीआयएला युरोप आणि यूकेमध्ये उड्डाण करण्यास बंदी

दरम्यान, 2020 मध्ये बनावट पायलट परवाना घोटाळा उघडकीस आल्यानंतर युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने पीआयएला युरोप आणि यूकेमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली होती. ही बंदी अजूनही कायम आहे. यामुळे विमान कंपनीला दर वर्षी मिळणारा सुमारे 40 अब्ज रुपयांचा महसूल बुडतो. एअरलाइनने सांगितले की, पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या आर्थिक संकटामुळे त्यांची विमाने कर्जदारांनी जप्त केली आहेत. नवीन खरेदीदाराने ते विकत घेतल्यास, नियंत्रण सोपवण्यापूर्वी पुढील पाच ते सहा महिने ती चालू ठेवण्यासाठी तब्बल 23.7 अब्ज रुपयांची आवश्यकता असेल.

150 हून अधिक देशांमध्ये पीआयएची उड्डाणे

पीआयएची उड्डाणे 150 हून अधिक देशांमध्ये जातात. एअरलाइन्सला दरवर्षी 280 अब्ज रुपयांचा महसूल मिळतो. हिथ्रो येथे त्याचे 10 स्लॉट आहेत, ज्यांची वार्षिक किंमत 70 अब्ज रुपये आहे. PIA ची मार्केट कॅप एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT