Pakistan: भारताच्या मार्गावर चालणार पाकिस्तान; आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी बनवला 'हा' प्लॅन!

Pakistan New Currency: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Pakistan Currency
Pakistan CurrencyDainik Gomantak

Pakistan New Currency: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारताचा कट्टर शत्रू आणि शेजारी देश पाकिस्तान आर्थिक संकटाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. पाकिस्तानला या जाळ्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसताना तो भारताची कॉपी करणार आहे. यासाठी पाकिस्तानने संपूर्ण प्लॅन तयार केला असून लवकरच तो आपल्या देशात लागू करणार आहे. शेजारील देशात आधीच महागाई आणि आर्थिक संकट असून आता आणखी एक समस्या तेथील जनतेला भेडसावणार आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे (एसबीपी) गव्हर्नर जमील अहमद यांनी बनावट नोटा आणि पैशाच्या टंचाईला तोंड देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. भारताप्रमाणेच आता पाकिस्तानही नव्या नोटा जारी करणार आहे. या नोटा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. तसेच, पाकिस्तानी चलनाची रचना वेगळ्या पद्धतीने केली जाईल आणि त्याला एक विशिष्ट सुरक्षा क्रमांकही असेल.

Pakistan Currency
Iran-Pakistan Tension: एअर स्ट्राइकनंतर 'पेनल्टी स्ट्राइक' च्या तयारीत इराण; पाकिस्तानकडे करणार कोट्यवधींची मागणी

नव्या नोटेची घोषणा करताना एसबीपीचे गव्हर्नर जमील अहमद म्हणाले की, ''पाकिस्तानातील चलन बदलण्याचे काम हळूहळू केले जाईल, जेणेकरुन जनतेला कोणतीही अडचण येऊ नये.'' भारतावर नाव न घेता हल्ला करताना ते म्हणाले की, 'गेल्या काही वर्षांत अनेक देशांमध्ये सार्वजनिक पातळीवर अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतात 2016 मध्ये नोटबंदी झाली, त्यावेळी लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले होते.'

Pakistan Currency
Pakistan: पाकिस्तानचे माजी मंत्री शाह मलिक यांच्या घराबाहेर स्फोट, दोन जण जखमी; ISI चा हात

दरम्यान, पाकिस्तानच्या काही अर्थ तज्ज्ञांनी नव्या चलनावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, देशातील बनावट नोटा आणि काळा पैसा संपुष्टात येईल का? 5000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात येणार का? त्याचबरोबर पाकिस्तानच्या या निर्णयामुळे जनतेला आणि उद्योगधंद्यांना कोणतीही अडचण होऊ नये, हेही लक्षात घेतले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com