Islamia University Sex Scandal Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Sex Scandal: पाकिस्तानी विद्यापीठात ड्रग्ज आणि सेक्सचा घाणेरडा खेळ! विद्यार्थिनींचे 5500 अश्लील व्हिडिओ लीक

Islamia University Sex Scandal: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Islamia University Sex Scandal: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानच्या (Pakistan) एका प्रसिद्ध विद्यापीठात सेक्स आणि ड्रग्जचा घाणेरडा खेळ बराच काळ सुरु होता, त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात आता विद्यार्थिनींचे 5500 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. यादरम्यान अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले, जे पाहून हे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरु असल्याची माहिती मिळाली.

तपासादरम्यान अनेक व्हिडीओही आढळून आले आहेत, ज्यामध्ये प्रथम मुलींना अंमली पदार्थांचे व्यसन लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांचे अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु होतो.

पाकिस्तानी विद्यापीठात घाणेरडा खेळ

दरम्यान, हे प्रकरण पाकिस्तानच्या इस्लामिया विद्यापीठातील आहे. हे विद्यापीठ आता ड्रग्ज आणि लैंगिक शोषणाचे केंद्र बनल्याचे पाक पोलिसांनी उघड केले आहे. पोलिसांच्या (Police) तपासात असे अनेक पुरावे मिळाले आहेत, जे याला पुष्टी देतात.

आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल फोन आणि इतर पुराव्यांवरुन इस्लामिया विद्यापीठात वर्षानुवर्षे हा घाणेरडा खेळ सुरु असल्याचे उघड झाले आहे.

एजाज हुसेन असे या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी या टोळीकडून हजारो अश्लील व्हिडिओचा वापर केला जात होता.

अशा प्रकारे या टोळीचा खुलासा झाला

दुसरीकडे, अबू बकरला अटक केल्यानंतर या टोळीला पकडण्यात पाक पोलिसांना यश आले आहे. अबू बकर हा इस्लामिया युनिव्हर्सिटी बहावलपूरचा वित्त संचालक आहे, जो नुकताच एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला होता.

त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 30 ग्रॅम चरसही जप्त करण्यात आले. अबू बकरसोबत हजारो घाणेरडे व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामुळे तो मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांचे लैंगिक शोषण करायचा.

अबू बकरनंतर पोलिसांनी निवृत्त मेजर एजाज हुसैन यांच्यावर छापा टाकला. एजाज हुसेन हे कॉलेजमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून तैनात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT