Pakistan: इमरान खान यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाने उचलले मोठं पाऊल

Pakistan: वारंवार आदेश देऊनही आयोगासमोर हजर राहण्यासाठी इमरान खान यांनी टाळाटाळ केली आहे.
 Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Pakistan: पाकिस्तानमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने अशांतता असल्याचे पाहायला मिळते. या अशांततेचे कारण कधी आर्थिक संकट तर कधी राजकीय अस्थिरता असल्याचे दिसून येते.

गेल्या काही काळापासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेवरुनदेखील पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. आता इमरान खान यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहीती मिळाली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) चे प्रमुख इमरान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इमरान खान यांना अटक करुन आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार, वारंवार आदेश देऊनही आयोगासमोर हजर राहण्यासाठी इमरान खान यांनी टाळाटाळ केली आहे.

निवडणूक आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचललले आहे. गेल्या वर्षी आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) चे प्रमुख इमरान खान आणि पार्टीचे माजी मंत्री फवाद चौधरी यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि त्यांच्या प्रमुखांविषयी बेजबाबदारपणे बोलल्यामुळे आणि अपमानजनक शब्दांचा वापर केल्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई सुरु केली होती.

निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याआधी इमरान खान यांना 16 जानेवारी आणि 2 मार्चलादेखील आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र इमरान खान यांनी या आदेशाचे पालन केले नाही.

त्यामुळे निवडणूक अधिनियमानुसार, 2017 च्या धारा 4 ( 2) नुसार इमरान खान यांच्याविरुद्ध गैर जामीन अटक वॉरंट जारी केले आहे. महत्वाचे म्हणजे, इमरान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबादचे पोलिस महानिरिक्षकांना ( आयजी ) निर्देश दिले आहेत.

 Imran Khan
रशियात लिंग बदलास बंदी, व्लादिमीर पुतिन यांची कायद्यावर स्वाक्षरी; LGBTQ+ समुदायाला धक्का

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणात गुन्हा दाखल केला गेला आहे. अजूनही अनेक खटल्यांवर सुनावणी सुरु आहे. याचबरोबर इमरान खान यांना अटक व्हावी यासाठी विरोध पक्षाकडून सतत प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com