Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan Attacked: इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर भारताची आली प्रतिक्रीया, म्हणाले...

Reaction of India on Imran Khan Attack: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर वजिराबाद शहरात हल्ला झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Reaction of India on Imran Khan Attack: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर वजिराबाद शहरात हल्ला झाला. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली. इम्रान यांच्यावर हा हल्ला आझादी मार्चदरम्यान झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्यावरील हल्ल्यावर भारताची प्रतिक्रीया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 'आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.'

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, 'ही घटना नुकतीच घडली आहे. पाकिस्तानात (Pakistan) सुरु असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.' दरम्यान, हल्ल्यानंतर इम्रान खान यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले की, 'अल्लाहने मला नवे जीवनदान दिले आहे. मी पुन्हा सर्व शक्तीनिशी लढेन.'

दुसरीकडे, इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात (Politics) पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावरही एका रॅलीत आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो हे पाकिस्तान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांच्या विरोधात इम्रान खान यांनी आंदोलन सुरु केले आहे.

काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, 'मी गृहमंत्र्यांना या घटनेचा अहवाल मागवण्यास सांगितले आहे. इम्रान खान आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT