Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: शाहबाज सरकारचा तुघलकी फर्मान, ऐकून तुम्हीही धरालं डोकं!

Pakistan PM Shehbaz Sharif: पाकिस्तानमध्ये सरकारने महालेखापालांना पगारासह सर्व बिलांची मंजुरी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: नगदी नोटांच्या तुटवड्याला तोंड देत असलेल्या पाकिस्तानमध्ये सरकारने महालेखापालांना पगारासह सर्व बिलांची मंजुरी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली.

'द न्यूज इंटरनॅशनल' या वृत्तपत्राने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, वित्त आणि महसूल मंत्रालयाने पाकिस्तानी महसूल महालेखापाल (AGPR) यांना पुढील आदेश येईपर्यंत केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि संबंधित विभागांच्या सर्व बिलांची मान्यता थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

वृत्तानुसार, आर्थिक संकटामुळे देशाला ऑपरेशनल फंड जारी करण्यात खूप अडचणी येत आहेत. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचा (Pakistan) परकीय चलन साठा 2.9 अब्ज डॉलरवर घसरला होता. आता त्यात थोडी सुधारणा होऊन चार अब्ज डॉलर्स झाले आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 1.1 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजची पाकिस्तान आतुरतेने वाट पाहत आहे.

अर्थमंत्री इसाक दार म्हणाले की, ही बातमी चुकीचीही असू शकते. मात्र, वृत्ताची पुष्टी झाल्यावर योग्य तथ्य सांगण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सूत्रांनी सांगितले की, ते एजीपीआर कार्यालयात प्रलंबित बिले काढण्यासाठी गेला होते, परंतु सध्याच्या आर्थिक संकटामुळे वित्त मंत्रालयाने त्यांना पगारासह इतर सर्व बिले क्लिअर न करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT