Tipu Sultan

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

बाबर अन् टिपू सुलतानवर पाकिस्तान सरकार बनवणार 'बायोपिक'!

इम्रान खान (imran khan) यांच्या सरकारने मुघल सम्राट जहीरुद्दीन बाबर, टिपू सुलतान आणि उर्दू कवी मुहम्मद इक्बाल यांच्यावर कोट्यवधी डॉलर्स खर्च करुन बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी पैसे नसलेल्या आणि सरकारी खर्च भागवण्यासाठी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि इतर सरकारी आस्थापनांना भाडे द्यावे लागलेल्या पाकिस्तान सरकारचा कर्ज घेण्याच्या विकृत इतिहासात चांगलाच रस वाढला आहे. त्यामुळे इम्रान खान (imran khan) यांच्या सरकारने मुघल सम्राट जहीरुद्दीन बाबर (zahiruddin babur) , टिपू सुलतान (tipu sultan) आणि उर्दू कवी मुहम्मद इक्बाल यांच्यावर कोट्यवधी डॉलर्स खर्च करुन बायोपिक (biopic) बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतची घोषणा करताना पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, आम्हाला या कामात इराण (iran) आणि उझबेकिस्तान (uzbekistan) सहकार्य करतील. इराणसोबत ते उर्दू कवी मुहम्मद इक्बाल (muhammad iqbal) आणि उझबेकिस्तानसोबत बाबरवर चित्रपट बनवणार आहे. याशिवाय पाकिस्तान एका खासगी प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने टिपू सुलतानवर चित्रपट बनवणार आहेत.

दरम्यान, पाकिस्तान टेलिव्हिजन नेटवर्कने चित्रपट विभाग तयार केला असून त्याद्वारे बाबर आणि इक्बाल यांच्यावरील चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे दोन्ही चित्रपट आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित असतील, असा पाकिस्तानचा दावा आहे. ते पुढे म्हणाले की, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने यापूर्वीच एनओसी घेतली आहे. पीटीव्ही फिल्म्स अंतर्गत तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कल्पनांवर आधारित चित्रपट बनवण्याची संधी दिली जाईल. पाकिस्तानात आणखी चित्रपटगृहे सुरु केली जातील, असेही मंत्री म्हणाले. यासोबतच चित्रपटसृष्टीलाही चालना मिळणार आहे. सिनेमागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेचे औद्योगिक आणि घरगुती दर सरकार जाहीर करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT