Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: भारताला परमाणू बॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या माजी गृहमंत्री राशिद यांना अटक

Pakistan: परंतु ज्यावेळी २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवले होते तेव्हा राशिद अहमद यांनी ज्याप्रकारे वक्तव्य केले होते त्यावरुन पाकिस्तानच्या सैन्याची खिल्ली उडवली गेली होती.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानमध्ये सध्या गदारोळ माजला आहे. राजकीय अस्थिरता निर्माण झालेली दिसत असून अटकसत्र संपण्याचे चिन्ह दिसत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पीटीआय प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना काही दिवसापूर्वीच अटक करण्याता आली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या अटकेबरोबर संबंध

आता त्यांचे जवळचे सहकारी आणि मित्र आवामी मुस्लिम लीगचे नेते शेख राशिद यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जेव्हापासून इमरान खान यांना अटक केली आहे तेव्हापासून त्यांच्या जवळच्या लोकांना अटक करण्याच्या सत्राला सुरुवात झाली आहे.

आता त्यांच्या अटकेनंतर इमरान खान यांच्या पार्टीने राशिद यांच्या अटकेला विरोध करत निंदा केली आहे. ७२ वर्षीय राशिद यांचा कोणत्याही प्रकरणात समावेश नसल्याचे म्हटले आहे.

कितीजणांना अटक

पाकिस्‍तानचे वर्तमानपत्र द एक्सप्रेस ट्रिब्‍यून च्या रिपोर्टनुसार, माजी गृहमंत्री आणि अवामी मुस्लिम लीग (एएमएल) चे अध्यक्ष शेख राशिद अहमद यांना रावळपिंडींच्या एका हाऊसिंग सोसाइटीतून अटक केली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, इस्लामाबादच्या पोलिसांनी राशिद यांना त्यांच्या भाच्यासहित आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

भारतासोबत राशिद यांचा असा आहे संबंध

राशिद यांनी सत्तेत असताना भारताला अनेकवेळा धमक्या दिल्या आहेत. परंतु ज्यावेळी २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवले होते तेव्हा राशिद अहमद यांनी ज्याप्रकारे वक्तव्य केले होते त्यावरुन पाकिस्तानच्या सैन्याची खिल्ली उडवली गेली होती.

पाकिस्तानी सैन्याकडे अर्धा पावपासून एक पाव पर्यंत अॅटम ( Atom Bomb ) बॉम्ब आहेत. त्यानंतर २०२० मध्ये राशिदने भारताला परमाणु युद्धाची धमकी दिली होती.

जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर हा याचा परिणाम म्हणून परमाणु युद्धाला सुरुवात होईल असे म्हटले आहे. पाकिस्तानचे सैन्य पारंपारिक हत्यारात कमजोर आहे त्यामुळे त्यांना परमाणू बॉम्ब वापरावे लागणार आहेत. असे त्यांनी वक्तव्य केले होते.

आता राशिद यांच्या अटकेचे परिणाम काय होणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातल्याचे दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT