Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: अखेर पाकिस्तानने हार मानली! काश्मीर मुद्द्यावर...

Pakistan: काश्मीरप्रश्नावरुन भारत- पाकिस्तानमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप करत असतात.

दैनिक गोमन्तक

Pakistan: भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच दहशतवादच्या मुद्यावरुन नेहमीच वादविवाद होत असतात. काश्मिरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानमध्ये शत्रुत्व निर्माण करणारा महत्वाचा मुद्दा आहे.

काश्मीरप्रश्नावरुन भारत- पाकिस्तानमध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोप करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देश आपापली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असाताना दिसतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाची संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना होय. पाकिस्तान आणि भारत संय़ुक्त राष्ट्र संघटनेत काश्मीरवरील आपला ताबा कसा योग्य आहे किंवा काश्मीर आमच्या मालकीचे कसे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात.

आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अंजेड्यामध्ये काश्मीरच्या मुद्दयाला आणण्यासाठी इस्लामाबादला कठिणाईचा सामना करावा लागत आहे.

पुढे बिलावल भुट्टो जरदारी यांनी म्हटले आहे की आम्ही जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या मंचावर काश्मीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमचा शेजारी मित्रराष्ट्र असे भासवण्याचा प्रयत्न करतो की संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडण्याइतका हा मोठा प्रश्न नाही.

भारताचे म्हणणे असे असते की हे विवादित क्षेत्र नाही ज्याला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मान्यतेची गरज असेल. दरम्यान, भारताने 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर भारत ( India )आणि पाकिस्तान( Pakistan )मधील काश्मीर प्रश्नासंबंधीचा वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT