Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानात महापूर; 1208 लोकांचा मृत्यू, 3 कोटींहून अधिकांचा संसार पाण्यात

Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 1200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 1200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यांच्यासमोर खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, मॉन्सूनच्या विक्रमी पावसामुळे आलेल्या पुरामुळे 1208 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 416 मुले आणि 244 महिलांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुरामुळे 6082 लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान, तीन दशकांतील सर्वाधिक पाऊस आणि हिमनद्या वितळल्यामुळे देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. सिंध आणि बलुचिस्तान (Balochistan) प्रांतांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गिलगिट बाल्टिस्तानला भेट दिल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) म्हणाले, "पुरामुळे इथे झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. संपूर्ण देश महापूरात आहे. तुम्ही कुठेही जाल, तुम्हाला सर्वत्र विध्वंस दिसेल.''

पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात धोकादायक पूर

पाकिस्तानच्या (Pakistan) इतिहासातील सर्वात धोकादायक पूर असे त्याचे वर्णन केले जात आहे. देशातील एक तृतीयांश लोकसंख्येला पाण्याखाली जगावे लागत आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने काही सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत, ज्यामध्ये पुराची तीव्रता पाहता येते. पुराच्या पाण्यात अडकल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळते नाहीयेत. पुरामुळे येथील लाखो एकर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे.

पुराच्या काळात भूक ही मोठी समस्या बनत आहे

चॅरिटी अ‍ॅक्शन अगेन्स्ट हंगरच्या मते, पाकिस्तानमधील 27 दशलक्ष लोकांकडे पुरापूर्वी पुरेसे अन्न नव्हते. आता उपासमारीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. युनायटेड किंगडमस्थित आपत्ती आपत्कालीन समितीचे मुख्य कार्यकारी सालेह सईद यांनी मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, 'पाण्याची पातळी वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.'

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस पाकिस्तानला भेट देऊ शकतात

परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार अहमद यांनी सांगितले की, या आपत्तीमुळे 33 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. आपत्तीचा सामना करण्यासाठी त्यांनी 160 दशलक्ष डॉलर्सची तात्काळ मदत करण्याचे आवाहन केले आहे. अहमद पुढे म्हणाले की, 'या कठीण काळात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाची एकता आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस 9-10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानला भेट देतील. ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका (America) यासह अनेक देश आणि जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांसह विविध जागतिक संस्थांनी मदत देऊ केली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT