Pakistan Flood: पाकिस्तानात पूरग्रस्त हिंदू मुलीवर राशन देण्याच्या बहाण्याने बलात्कार

पुर परिस्थितीचा फायदा घेत पूरग्रस्त हिंदू मुलीला राशन देण्याच्या बहाण्याने दोन मुलांनी सोबत नेले आणि तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.
Rape Case
Rape CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Flood Victim Raped in Pakistan: पाकिस्तानात सध्या पुराने कहर केला आहे. यादरम्यान अनेक कुटूंब आपल्या मुला बायकांसह रस्त्यावर आले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत पूरग्रस्त हिंदू मुलीला राशन देण्याच्या बहाण्याने दोन मुलांनी सोबत नेले आणि तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या एनजीओ व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीने ट्विट करून ही माहिती दिली. सिंध प्रांतातील शाहदादपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात ही घटना घडली. खालिद आणि दिलशेख नावाच्या दोन मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पूरग्रस्ताने सांगितले.

Rape Case
Pakistan Flood: पाकिस्तानात महाप्रलय, 4 अब्ज डॉलरचं, लष्कराकडून बचावकार्य

चार दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये उमरकोट परिसरात एका आठ वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि तिचे दोन्ही डोळे काडून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. गुंडांनी मुलीचा संपूर्ण चेहरा खराब केला असून तिला मृतावस्थेत सोडले होते. मुलीला अतिशय गंभीर अवस्थेत उमरकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 21 वर्षीय अमेरिकन व्लॉगर आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यावर सामूहिक बलात्कार झाला होता.

Rape Case
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Gotabaya Rajapaksa परतणार मायदेशी

पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंचा मुद्दा सोशल मीडियावर गाजत आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर झालेल्या बलात्काराच्या बातमीने दुखावलेले लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. काही लोक ट्विट करत आहेत की पाकिस्तान आणि बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंनी भारतात येऊन आपली घरे बांधावीत कारण या इस्लामिक देशांमध्ये अल्पसंख्याकांचे भविष्य नाही. पीएम मोदींना टॅग करत एका यूजरने, भारत पाकिस्तानच्या हिंदूंचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर कधी मांडणार? असा सवाल युजरने पंतप्रधानांना केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com