Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानात हाहाकार, अन्नधान्याचा तुटवडा कायम; PM Sharif यांनी केले मदतीचे आवाहन

Pakistan Flood Crisis: पुराच्या संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Flood Crisis: पुराच्या संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा सारख्या प्रांतांचे मोठे भाग पुरामुळे पाण्याखाली गेले आहेत. पाणी कमी होण्यासाठी 3 ते 6 महिने लागू शकतो. या पुरामुळे सुपीक जमिनीचा मोठा भागही पाण्याखाली गेला असून त्यामुळे अन्नधान्य उत्पादनातही अडचणी निर्माण होऊ शकते. सध्या अधिकाऱ्यांकडून लोकांना जेवण, तंबू आणि इतर गोष्टी पुरवल्या जात आहेत. परंतु हेही कमी पडत असून पाकिस्तानने जगभरातील देश आणि संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रविवारी रात्री तुर्कीचे अध्यक्ष रिचेप तय्यप एर्दोगन यांच्याशी चर्चा केली.

यावेळी, शरीफ यांनी तुर्कस्तानच्या (Turkey) राष्ट्राध्यक्षांचे मदतीबद्दल आभार मानले. तुमच्यामुळेच आम्ही अन्नधान्य संकटावर मात करु शकलो, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, तुर्कीने 12 लष्करी विमानांमधून अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा केला. याशिवाय 4 गाड्या आणि ट्रकमधूनही अत्यावश्यक साहित्य पाठवण्यात आला आहे.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बचाव समितीने सांगितले की, पुरामुळे पाकिस्तानात 3.6 दशलक्ष एकर पीक नष्ट झाले आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, शाहबाज शरीफ यांनी अर्दोन यांना बचाव कार्यासंबंधी माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी तुर्कस्तानला अन्नधान्य संकटाचा सामना करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली.

तसेच, पाकिस्तानातील पुरामुळे 6 लाख 60 हजार महिला आणि मुले बेघर झाली आहेत, ज्यांना रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या पाकिस्तानातील लष्कर, संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी आणि स्थानिक प्राधिकरणांकडून मदत पुरवली जात आहे. पाकिस्तान प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. आता ते इतर देशांतून गहू आणि भाजीपाला आयात करण्याबाबत बोलत आहेत. पाकिस्तानमध्ये भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती आतापासूनच वाढू लागल्या आहेत. आगामी काळात हे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय, गेल्या आठवड्यातच पाकिस्तान सरकारने सांगितले होते की, देशाचा एक तृतीयांश भाग पुराचा सामना करत आहे. सिंध आणि पूर्व पंजाबमधील (Punjab) मोठ्या भागात पुरामुळे शेतीवरही परिणाम झाला आहे. या भागांना पाकिस्तानची 'फूड बास्केट' म्हणून ओळखले जाते. अशा स्थितीत पुरामुळे इथे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील पुरामुळे 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान त्यापेक्षा खूप जास्त असू शकते. यामुळे पाकिस्तान आणि यूएनने जगभरातील देशांना मदतीचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

SCROLL FOR NEXT