Pakistan Flood: पाकिस्तानात पुराचा कहर, शेकडो लोकांचा मृत्यू, 4.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान

पूर आणि पावसामुळे पाकिस्तानातील परिस्थिती बिकट झाली असून सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
Pakistan Flood
Pakistan FloodTwitter
Published on
Updated on

Pakistan Flood: पाकिस्तानात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. एकीकडे पूर आणि पावसामुळे सुमारे 1 हजार जणांना जीव गमवावा लागला असताना, चालू आर्थिक वर्षात देशाचे 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पाऊस-पुराचा उद्रेक अजूनही सुरूच आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची खरी कल्पना येणे कठीण आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच कोट्यवधी रुपयांच्या मालाची नासाडी झाली आहे. त्याचवेळी पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे. पाकिस्तानला सौदी अरेबिया 3 अरब डॉलरची मदत करणार आहे. दरम्यान पाकिस्तानमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुर्कि वरून आज आपले पहिले विमान मदत सामग्रीसह पाठवण्यात आले आहे.

Pakistan Flood
Coke Studio चा गायक पाकिस्तानच्या पुरात झाला बेघर, इंटरनेटवर उठला मदतीचा आवाज

पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे

पूर आणि पावसामुळे पाकिस्तानातील परिस्थिती बिकट झाली असून सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, देशातील 70 टक्के भाग पुराच्या तडाख्यात असून सिंध प्रांताला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सिंध प्रांतातील 24 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पूर आणि पावसामुळे चालू खात्यातील तूट 4.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकते, जी जीडीपीच्या एक टक्के असेल. देशातील परिस्थिती पाहता पाकिस्तानला $2.6 अब्ज किमतीचा कापूस आणि $90 दशलक्ष किमतीचा गहू आयात करावा लागू शकतो.

पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, देशाला कापड निर्यातीत एक अब्ज डॉलर्सचे नुकसानही सहन करावे लागू शकते. असे मानले जाते की देशाचे एकूण नुकसान सुमारे 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. पाकिस्तानमध्ये पाऊस आणि पुरामुळे कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. पुरामुळे हे पिक पूर्णपणे नष्ट झाले आहे.

Pakistan Flood
होणारी बायको नापास होईल या भितीने पठ्याने शाळाच पेटवली

पाऊस आणि पुरात पिकांव्यतिरिक्त सुमारे पाच लाख गुरेही दगावली आहेत. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 1 हजार लोकांच्या मृत्यूमध्ये 343 मुलांचा समावेश आहे. पाऊस आणि पुरामुळे पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. देशाचा 70 टक्के भाग पुराच्या विळख्यात आहे. या भीषण पुरामुळे पाकिस्तानात 3 कोटी लोकं बेघर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com