Pakistan Female Reporting Video
ग्लोबल

PAK महिला रिपोर्टरने लाइव्हमध्ये आलेल्या मुलाच्या लगावली कानशिलात, Video Viral

पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान अनेक विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद होतात. आता पाकिस्तानातील (Pakistan) एका महिला पत्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान पाकिस्तानी महिला पत्रकारांनी रागाच्या भरात एका मुलाच्या कानशिलात मारल्याचे या व्हिडिओमध्ये (Video) स्पष्टपणे दिसत आहे.अनेकांच्या मनात या महिला पत्रकाराने गर्दीत उभ्या असलेल्या मुलाला का मारले? असा प्रश्न पडला आहे.

बकरीदच्या निमित्ताने रस्त्यावर लोकांनी वेढलेली एक महिला हा पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रिपोर्टिंग करत असताना गर्दीत उभा असलेला एक मुलगा कॅमेऱ्यासमोर हात हलवत आहे. यामुळे संतापलेल्या महिला पत्रकाराने कॅमेऱ्यातील तिचे बोलणे पूर्ण करताच शेजारी उभ्या असलेल्या मुलाच्या कानशिलात मारली. हा व्हिडिओ आतापर्यंत तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

महिला पत्रकाराच्या या कृत्याबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक तिला पाकिस्तानची लेडी चांद नवाबही म्हणत आहे. पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे ज्यात गर्दीमुळे अनेक वेळा टेक घेऊनही ती आपले बोलणे पूर्ण करू शकत नाव्हती. या व्हिडिओवर अनेक लोक महिला पत्रकाराची बाजू घेत आहेत आणि अनेकजण मजेशीर कमेंटही करत आहेत. त्याचबरोबर काही लोकं महिला पाकिस्तानी पत्रकाराच्या या कृतीची खिल्लीही उडवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT