Sri Lanka Crisis: श्रीलंकेत राष्ट्रपती भवनानंतर आंदोलकांचा जुन्या संसदेवर कब्जा

आंदोलकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागले आहेत.
Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेतील आर्थिक समस्येमुळे उद्भवलेले राजकीय संकट अधिक वाढत चालले आहे . गेल्या शनिवारी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातुन पळ काढला. त्याचबरोबर अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेचाही संयम सुटला आणि संतप्त आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. या आंदोलकांनी केवळ राष्ट्रपती भवनच नव्हे तर राष्ट्रपती भवनापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या संसदेवरही कब्जा केला आहे. हजारो लोक या इमारतीत पोहोचून आर्थिक संकटाला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत. (Sri Lanka Crisis News)

दुसरीकडे, तेथे उपस्थित पोलिस आणि प्रशासनातील लोकांचे म्हणणे आहे की, लोकांची गर्दी इतकी होती की आम्ही त्यांना रोखू शकलो नाही. त्यामुळेच आंदोलकांनी या इमारतीवरही कब्जा मिळवला आहे. श्रीलंकेतील जुनी संसदही आता पर्यटनस्थळ बनले आहे. त्यामुळेच आंदोलकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे लोक सेल्फी काढत आहेत, रस्त्यावर आल्यावर अशा ऐतिहासिक वास्तूंपर्यंत पोहोचल्यानंतर फोटो काढत आहेत. लहान मुलांसोबत या आंदोलनामध्ये सहभागी होमार आहे.

आंदोलक स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसले

दरम्यान, आंदोलकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होऊ लागले आहेत. ज्यामध्ये ते राष्ट्रपती भवनात मस्ती करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक लोक स्विमिंग पूलमध्ये धमाका करताना दिसत आहेत, तर काही लॉनमध्ये रॉयल लंच करताना दिसत आहेत.

श्रीलंकेत मार्च महिन्याच्या शेवटी झालेली वीज कपात ही आतापर्यंतची सर्वात वाईट होती. या कारणास्तव लोकांनी कोलंबोमध्ये विरोध करण्यास सुरुवात केली. या देशात वर्षातील सर्वात उष्ण महिन्यांमध्ये दिवसाचे 13 तास वीज खंडित करण्यात आली होती. त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होउन हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निदर्शने करू लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com