Pakistan  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Passport: घ्या आता पासपोर्ट लॅमिनेशन करायला पाकिस्तानकडे नाही पेपर; नागरिक त्रस्त

पासपोर्टमध्ये वापरण्यात येणारे लॅमिनेशन पेपर पाकिस्तान फ्रान्समधून आयात करतो.

Pramod Yadav

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या विविध आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लॅमिनेशन पेपरच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना पासपोर्ट मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान, पासपोर्टमध्ये वापरण्यात येणारे लॅमिनेशन पेपर पाकिस्तान फ्रान्समधून आयात करतो.

पाकिस्तान सरकार लॅमिनेशन पेपरच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती पासपोर्ट महासंचालनालयाशी संबंधित एका व्यक्तीने स्थानिक वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल आणि लोकांना लॅमिनेशन पेपर सहज उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कराचीचा रहिवासी असलेल्या फैजान यांनी दोन महिन्यांपूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मात्र, अद्याप त्यांना पासपोर्ट मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास रद्द करावा लागला.

दरम्यान, पाकिस्तान मागील काही महिन्यापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कर्जाचा बोजा वाढल्याने देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. पेट्रोल, खाद्य तेल, भाजीपाला यासह विविध धान्य देखील महाग झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

तसेच, देशातील राजकीय वातावरण देखील अस्थिर आहे. देशाचे माजी पंतप्रधान सध्या एका प्रकरणात तुरुंगात आहेत. तर, माजी पंतप्रधान नवाज शरीफ पुन्हा देशात दाखल झाले आहेत. यामुळे पुढील काळात पाकिस्तानमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT