Pakistan Currency Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Crisis: दिवाळखोर PAK चा मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यादरम्यान बातम्या येत आहेत की, या संकटामुळे पाकिस्तान सरकारने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे प्राप्त झाली आहे. परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यानंतर पाकिस्तान अलीकडच्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

पगारात 10 टक्के कपात होणार आहे

जिओ न्यूजने वृत्त दिले आहे की, पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी स्थापन केलेली राष्ट्रीय समिती (एनएसी) सर्व विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्यासह विविध प्रस्तावांवर विचार करत आहे. अहवालानुसार, NAC मंत्रालये/विभागांचा खर्च 15 टक्क्यांनी कमी करण्याचा, फेडरल, राज्य मंत्री आणि सल्लागारांची संख्या 78 वरुन 30 पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे.

आयएमएफकडून मदत मिळण्याची आशा आहे

बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत या मतांवर निर्णय घेण्यात येणार असून समिती आपला अहवाल पंतप्रधानांना पाठवेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून अधिक मदतीची अपेक्षा असल्याने सरकार कमी खर्चाच्या प्रस्तावांना अंतिम रुप देत आहे, परंतु सरकार आपल्या अटी लागू करण्यास टाळाटाळ करत आहे.

महागड्या खाद्यपदार्थ

डॉनच्या वृत्तानुसार, कराची, क्वेटा आणि लाहोरसारखी मोठी शहरे अजूनही वीजेविना आहेत. येथेही विजेचे संकट पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये पिठाची किंमत 150 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. येथे 15 किलो पिठाची बॅग 2250 रुपयांना विकली जात आहे. यासोबतच लाहोरमध्ये पिठाची किंमत 145 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT