Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: राजकीय संघर्ष होताच पाकिस्तानी नेते लंडनलाच का पळून जातात, इम्रान काय करणार?

Pakistan: इतिहास साक्षी आहे की, ज्याने पाकिस्तानात लष्कराशी पंगा घेतला, त्याला एकतर तुरुंगवास भोगावा लागला किंवा देशातून पळून जावे लागले.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही देश सोडण्याची वेळ येऊ शकते, असे बोलले जात आहे.

इतिहास साक्षी आहे की, ज्याने पाकिस्तानात लष्कराशी पंगा घेतला, त्याला एकतर तुरुंगवास भोगावा लागला किंवा देशातून पळून जावे लागले.

आता, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आर्मी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना एकतर लंडनला पळून जावे लागेल अन्यथा खटल्याला सामोरे जावे, असा अल्टिमेटम देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

इम्रान हे पहिले नेते नाहीत ज्यांना लंडनला पळून जावे लागेल. पाकिस्तानी नेत्यांचे 'लंडनप्रेम' खूप जुने आहे.

बेनझीर भुट्टो यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी आणि स्वत: माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी लंडनला एक प्रकारे त्यांचे अनधिकृत कार्यालय बनवले होते.

1979 मध्ये त्यांच्या वडिलांना फाशी दिल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या आईला अटक करण्यात आली होती. सुमारे एक वर्षानंतर त्यांची सुटका झाली, पण 1981 मध्ये बेनझीर यांना पुन्हा अटक करण्यात आली.

तुरुंगवासानंतर त्या जवळपास दोन वर्षे नजरकैदेत राहिल्या. अमेरिकेचा दबाव वाढल्यानंतर 1984 मध्ये लष्कराने बेनझीर यांना जिनिव्हाला जाणाऱ्या विमानात बसवले होते.

तसेच, जिनिव्हाहून बेनझीर थेट लंडनला गेल्या, तिथे त्यांनी भाड्याने एक फ्लॅट घेतला होता. यासोबतच त्यांच्या आजारावर उपचारही करुन घेतले.

हळुहळू बेनझीर यांनी या फ्लॅटला आपले पक्ष कार्यालय बनवले. 1985 मध्ये त्या पुन्हा पाकिस्तानात परतल्या, पण 90 च्या दशकात त्यांना पुन्हा लंडनमध्ये (London) आश्रय घ्यावा लागला. 2007 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधीही त्या लंडनमध्ये होत्या.

नवाझ शरीफ आणि बेनझीर शेजारी बनले

पाकिस्तानात एकमेकांविरुद्ध गरळ ओकणारे बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ लंडनमध्ये (London) चांगले शेजारी बनले. 1999 मध्ये मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली तेव्हा नवाझ शरीफ यांनीही लंडनमध्ये आश्रय घेतला होता.

10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या ऐवजी, त्यांनी लंडनला जाण्याच्या लष्कराच्या प्रस्तावाला होकार दिला. 2000 मध्ये ते लंडनला गेले.

2007 मध्ये परतले, पण 2019 मध्ये इम्रान सरकार आल्यावर त्यांना पुन्हा परतावे लागले. तरीही त्यांनी लंडनमधूनच पक्ष चालवला आणि भाऊ-मुलीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेत आले.

परवेझ मुशर्रफ

ज्या परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना लंडनला पाठवले, त्याच माजी लष्करप्रमुखांना नंतर त्यांचे शेजारी व्हावे लागले. 2008 नंतर वेळ बदलली.

नवाझ शरीफ आता पंतप्रधान होते आणि मुशर्रफ यांना लंडनला जावे लागले. मात्र, अखेरच्या दिवसात ते दुबईला गेले, तिथे विस्मृतीत जगत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. याशिवाय, अनेक पाकिस्तानी नेत्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आहे.

लंडनच का?

आता प्रश्न पडतो की, लंडनच का? किंबहुना आपल्याच देशात 'गुन्हेगार' म्हणून सिद्ध झाल्यानंतर लंडन हे सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे सिद्ध होते.

यूकेचे कायदे असे आहेत की, ते निर्वासितांना संरक्षण देतात. ब्रिटनच्या प्रत्यार्पण कायद्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना वाचवण्याची संधी मिळते. यातील कलम 9 मध्ये अशा चार तरतुदी आहेत, ज्या आश्रय मागणाऱ्याला येथे राहण्याचे स्वातंत्र्य देतात.

याशिवाय, येथे मानवी हक्क कायदाही अतिशय कडक आहे. हा कायदा प्रत्येक नागरिकाच्या 15 मूलभूत अधिकारांचे संरक्षण करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT