Imran Khan
Imran Khan Twitter
ग्लोबल

Pakistan Election Results: पाकिस्तानचा नवा 'वजीर-ए-आझम' कोण? तुरुंगात असलेल्या इम्रान यांचा पक्ष 150 जागांवर पुढे

Ashutosh Masgaunde

Who will be the new 'Wazir-e-Azam' of Pakistan? Imprisoned Imran Khan's party PTI leads in 150 seats:

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. इम्रान खान यांना पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार 150 हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

नेटिझन्सच्या मते, PTI समर्थित उमेदवारांनी नॅशनल असेंब्लीच्या 154 जागांवर आघाडी घेतली आहे. तर पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्ष 47-47 जागांवर आघाडीवर आहेत.

ट्रेंडनुसार, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम प्रत्येकी 4 जागांवर आघाडीवर आहेत. (Pakistan Election Results)

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 266 जागांवर निवडणूक होत आहे. 70 जागा राखीव आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीटीआयचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान यांनी दावा केला आहे की, त्यांचा पक्ष नॅशनल असेंब्लीमध्ये 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॅरिस्टर गौहर म्हणाले की, पीटीआय केंद्र आणि खैबर-पख्तूनख्वा प्रांतात प्रचंड विजयानंतर सरकार स्थापन करेल.

पीटीआय पक्षाचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर अदियाला तुरुंगात बंद आहेत.

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका आणि प्रांतीय निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. आता ट्रेंड समोर येत आहेत. आज अधिकृत निकाल अपेक्षित आहेत.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांचे समर्थक बहुतांश जागांवर आघाडीवर आहेत. इम्रान यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह बॅट जप्त झाल्यानंतर सर्व उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

निकालाच्या ट्रेंडमुळे पीटीआय समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. हा इम्रान खान, त्यांचा पक्ष आणि पाकिस्तानचा मोठा विजय असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.

दुसरीकडे, या निवडणुकीमुळे लोकशाही मजबूत होईल, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. लष्कराने जनतेचे अभिनंदन केले आणि म्हटले की, निवडणुकांचे निकाल काहीही लागो, त्यामुळे देशातील लोकशाही मजबूत होईल.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने गैरप्रकार, हिंसाचार आणि मोबाइल-इंटरनेट बंदीच्या आरोपांदरम्यान शुक्रवारी पहाटे निकाल जाहीर केले.

ईसीपीचे विशेष सचिव जफर इक्बाल यांनी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, इम्रान खानच्या पक्ष पीटीआयने पाठिंबा दिलेल्या अपक्ष समिउल्ला खान यांनी 18 हजारांहून अधिक मते मिळविली, ज्यामुळे त्यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतीय विधानसभेची जागा जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT