ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर प्रवासी जहाज बुडाले; 13 जणांचा मृत्यू, 27 बेपत्ता

Sudanese Migrant Ship Sank Off Tunisian Coast 13 Dead: ट्युनिशियामधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रवासी जहाज बुडाले.
Sudanese Migrant Ship Sank Off Tunisian Coast 13 Dead
Sudanese Migrant Ship Sank Off Tunisian Coast 13 DeadDainik Gomantak
Published on
Updated on

Sudanese Migrant Ship Sank Off Tunisian Coast 13 Dead: ट्युनिशियामधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रवासी जहाज बुडाले. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 27 बेपत्ता आहेत. मरण पावलेले सर्व सुदानचे आहेत. जहाजावर एकूण 42 लोक होते.

स्फॅक्सवरुन जहाज निघाले होते

ट्युनिशियाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, बुधवारी स्फॅक्सहून (Sfax) निघालेले जहाज ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर बुडाले. यामुळे सुदानमधील 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. 27 लोक अजूनही बेपत्ता आहेत. न्यायाधीश फरीद बेन झा यांनी सांगितले की, जहाजामध्ये 42 लोक होते, जे सर्व सुदानी होते. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

2023 मध्ये ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर 1000 प्रवाशांचे मृतदेह सापडले

आफ्रिकेतून इटलीला पोहोचण्याच्या आशेने प्रवाशांना घेऊन जाणारी जहाजे ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर बुडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 2023 मध्ये ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर बुडलेल्या सुमारे 1,000 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा आकडा इतर कोणत्याही वर्षांपेक्षा जास्त आहे. सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ट्युनिशियन नागरिकांचाही समावेश आहे. इटलीला जाणाऱ्या बोटीतून गेल्या महिन्यात सुमारे 40 ट्युनिशियन स्थलांतरित बेपत्ता झाले होते.

गृहयुद्धामुळे 9 दशलक्ष लोकांनी सुदान सोडले

सुमारे 10 महिन्यांपूर्वी सुदानमधील गृहयुद्धात 9 दशलक्ष लोकांना घरे सोडून पळून जावे लागले. त्यापैकी बहुतेकांनी देशाच्या सुरक्षित भागात किंवा शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लष्कर आणि प्रतिस्पर्धी निमलष्करी दलांमध्ये संघर्ष सुरु झाला, त्यानंतर भारतासह अनेक देशांनी सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com