Pakistan demands to scrap Article 370 in Un Dainik Gomantak
ग्लोबल

कलम 370 हटवा, पाकिस्तनाची UN मध्ये नापाक मागणी

काश्मीरमध्ये कलम 370 (Article 370) पुन्हा लागू करण्यात यावे, असे सांगत पाकिस्तानने(Pakistan) संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मु कश्मीरच्या (Jammu Kashmir) बाबतीत जेंव्हा पाकिस्तनाचे(Pakistan) कुणीच ऐकायला तयार नाही म्हणून आता पाकिस्तानने आता संयुक्त राष्ट्राचा (United Nations) दरवाजा ठोठावला आहे. काश्मीरमध्ये कलम 370 (Article 370) पुन्हा लागू करण्यात यावे, असे सांगत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पाकने पुन्हा एकदा भारताविरुद्ध(India) विष ओकण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताने घटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण झाल्यावर, पाकिस्तानचे मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासचिव यांना या पत्राद्वारे कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी आपल्या पत्रात यावर भर दिला आहे की काश्मीर प्रश्नावर परस्पर संवादासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची असून भारताने यावर पुढाकार घ्यायला हवा.

जम्मु मध्ये आता जे वातावरण आहे ते वातावरण बदलण्यासाठी भारताने जम्मू -काश्मीरमध्ये लागू केलेले सर्व एकतर्फी आणि बेकायदेशीर नियम त्वरित काढून टाकले पाहिजेत, असेही या पत्रात म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी आणि नंतर लागू करण्यात आलेले लोकसंख्याशास्त्रीय बदल मागे घेण्यासह अनेक मागण्या या पात्रात करण्यात आल्या आहेत.

दक्षिण आशियातील शाश्वत शांततेसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू -काश्मीर वादाचे योग्य निराकरण आवश्यक आहे. कुरेशी यांनी आपल्या पत्रात यूएनएससीला काश्मिरींच्या हक्कांशी संबंधित ठरावांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे दायित्व पूर्ण करण्यास सांगितले.

आज कलम 370 हटवून जळवपास २ वर्ष पूर्ण झाले असून आणखीनही तिथली परिस्थिती सुधरताना दिसत नाही. पण पाकिस्तानने आपल्या काहीनाकाही कुचाकोऱ्या सुरूच ठेवल्या आहेत. भारताने यापूर्वी अनेकदा कलम 370 हा आमचा खाजगी विषय असून त्यात इतर कोणीही लक्ष घालू नये असे स्पष्टीकरण दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT