Pakistan Crime Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Violence: कुराणाच्या अपमानावरुन जमावाने पोलीस ठाण्याला लावली आग; संशयिताला जिवंत जाळले

Man Killed For Desecrating Quran: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात कुराणाची कथित विटंबना केल्याबद्दल संतप्त जमावाने एका व्यक्तीची हत्या केली.

Manish Jadhav

Mob Set Police Station on Fire: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात कुराणाची कथित विटंबना केल्याबद्दल संतप्त जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. तर हिंसाचारात आठ जण जखमी झाले. संतप्त जमावाने आरोपीला गोळ्या घालून जाळले. यानंतर अर्धा जळालेला मृतदेह लटकवण्यात आला. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. स्वात जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ) जाहिदुल्ला यांनी सांगितले की, पंजाबच्या सियालकोटमधील एका व्यक्तीने गुरुवारी रात्री स्वातच्या मदायन तहसीलमध्ये कुराणची काही पाने जाळल्याचा आरोप आहे.

जाहिदुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला ताब्यात घेऊन मदायन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाने संशयिताला ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी संशयिताला त्यांच्या हवाली देण्यास नकार दिल्यावर जमावातील कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली, त्यानंतर पोलिसांनीही (Police) प्रत्युत्तरादाखल कारवाई केली.

दरम्यान, दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मदायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जाहिदुल्ला यांनी सांगितले. त्यानंतर जमावाने पोलिस स्टेशन पेटवून दिले, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. जमावातील काही जणांनी पोलिस ठाण्यात घुसून संशयितावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर त्यांनी संशयिताचा अर्धा जळालेला मृतदेह लटकवला.

तसेच, या घटनेमुळे उसळलेल्या हिंसाचारात आठ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे दिलेल्या माहितीनुसार, मदायनमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. खैबर पख्तुनख्वाचे (Khyber Pakhtunkhwa) मुख्यमंत्री अली अमीन गंदापुर यांनी या घटनेची दखल घेत प्रांतीय पोलीस प्रमुखांकडून या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश दिले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT