Crime Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan News: भीषण! न्यायाधीशाच्या पत्नीने पार केली क्रूरतेची सीमा, 14 वर्षांची मुलगी मृत्यूच्या दारात...

Pakistan: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला केलेल्या टॉर्चरने संपूर्ण इस्लामाबाद हादरले.

Manish Jadhav

Pakistan News: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला केलेल्या टॉर्चरने संपूर्ण इस्लामाबाद हादरले.

एका न्यायाधीशाच्या पत्नीने 14 वर्षीय मुलीला इतके टॉर्चर केले की, तिच्या पाठीचा कणा तुटला, तिचे हात पाय आणि संपूर्ण चेहरा विद्रूप केला.

तिचे वडील तिला भेटण्यासाठी आले असता ही बाब उघडकीस आली. नंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ती आपल्या जीवाशी लढत आहे.

दरम्यान, लाहोर जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, पुढील 48 तास मुलीसाठी खूप महत्वाचे आहेत. गेल्या सहा दिवसांपासून ती रुग्णालयात (Hospital) आहे. तिला विष देण्यात आल्याचे मुलीच्या कुटुंबीयांचे मत आहे.

25 जुलै रोजी पीडितेला गंभीर जखमी अवस्थेत लाहोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ही बाब उघडकीस आली.

दुसरीकडे, पोलिसांनी दिवाणी न्यायाधीशांच्या पत्नीविरुद्ध त्यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जेव्हा वडील आपल्या मुलीला भेटण्यासाठी न्यायाधीशांच्या घरी पोहोचले

पोलिसांना (Police) दिलेल्या तक्रारीत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा ते न्यायाधीशांच्या घरी पोहोचले तेव्हा मुलीच्या रडण्याचा आवाज आला.

त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. ती जमिनीवर पडून रडत होती. उभेही राहता येत नव्हते. वडिलांनी तिला उचलून दवाखान्यात नेले.

मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, न्यायाधीशांच्या पत्नीने आपल्या मुलीचा अतोनात छळ केला. मुलीच्या शरीरावर जखमा होत्या. मुलीच्या ओठांवर आणि डोळ्यांना सूज, दात आणि बरगड्या तुटल्या आणि तिच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या.

मुलीच्या शरीरावर जखमा

वैद्यकीय अहवालानुसार मुलीच्या कपाळावर जखमा होत्या. ओठ सुजले होते, समोरचे दोन दात तुटले होते, नाकातून रक्तस्त्राव होत होता. पायाला अनेक जखमा, उजव्या हाताला फ्रॅक्चर, डाव्या आणि उजव्या पापण्या सुजल्या, पाठीवर अनेक जखमा आढळल्या.

दरम्यान, मुलीने सांगितले की, न्यायाधीशांची पत्नी तिला बेदम मारहाण करत असे. एफआयआरमध्ये तिला कोठडीत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुलीला विष देणाऱ्या वडिलांच्या दाव्यावर डॉक्टरांनी सांगितले की, पीडितेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवालाची प्रतीक्षा आहे.

उच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या पत्नीच्या अटकेला स्थगिती दिली

न्यायाधीशांच्या आरोपी पत्नीला अटक करण्यासाठी पोलिसांनी रावळपिंडी, लाहोर आणि गुजरानवाला येथे छापे टाकले, पण ती सापडली नाही. नंतर लाहोर उच्च न्यायालयाने तिच्या अटकेला 1 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली.

व्यवसायाने मजूर असलेल्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन हुमक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरनुसार, त्यांनी आपल्या मुलीला जरताज हाऊसिंग सोसायटीमधील न्यायाधीशांच्या घरी 10,000 रुपये प्रति महिना पगारावर नातेवाईकामार्फत पाठवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT