पबजी, फेसबुकनंतर आता स्नॅपचॅट! प्रेमासाठी आणखी एका महिलेने गाठले पाकिस्तान, धर्मांतर करून केला विवाह

आता एक चिनी महिला पाकिस्तानी प्रियकराला भेटण्यासाठी चीन सोडून खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे.
China Girl reached pakistan for love
China Girl reached pakistan for loveDainik Gomantak
Published on
Updated on

अलिकडे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशात घडणाऱ्या प्रेमकहाणी आणि त्यासाठी दुसऱ्या देशात पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. सीमा हैदर आणि अंजू यांच्यानंतर आता आणखी एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यात भारत नव्हे तर चीन आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.

एक चिनी महिला पाकिस्तानी प्रियकराला भेटण्यासाठी चीनमधून खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. या महिलेची सोशल मीडियावर मैत्री झाली आणि ते दोघे प्रेमात पडल्याचे सांगितले जात आहे.

गाओ फेंग असे या महिलेचे नाव आहे. गाओ बुधवारी चीनमधून गिलगिट मार्गे तीन महिन्यांच्या व्हिसावर इस्लामाबादला पोहोचली.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाजौर जिल्ह्यातील सुरक्षेच्या कारणामुळे जावेदने महिलेला त्याच्या गावी न जाता लोअर दीर ​​जिल्ह्यातील समरबाग तहसीलमध्ये मामाच्या घरी नेले. दोघे स्नॅपचॅटच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून संपर्कात होते. त्यानंतर दोघांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

चिनी महिला गाओ ने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर बुधवारी जावेदशी लग्न केले. त्याचे नवीन नाव किसवा असे ठेवण्यात आले आहे.

China Girl reached pakistan for love
मुलगा फूड डिलिव्हरी करतो म्हणून ठरलेले लग्न मोडलं, रागाच्या भरात त्याने मावशीच्या मुलीची केली हत्या

'जावेद आणि गाओचे बुधवारी लग्न झाले आणि त्यानंतर ते इस्लामाबादला रवाना झाले. मात्र, मोहरम आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्यांना उघड्यावर फिरण्यास मनाई केली आहे.' असे जावेदचा भाऊ इज्जतुल्ला याने एका पाकिस्तानी वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

दरम्यान, जावेदने बाजौर महाविद्यालयात संगणक विज्ञानाचा अभ्यासक्रम करत असून, जावेद शिक्षण पूर्ण केल्यानंतर चीनला जाणार आहे. दरम्यान, गाओ काही दिवसांत चीनला परतणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com