Pakistan Child Abuse Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Child Abuse Report: लहान मुलांसाठी पाकिस्तान नरक! बाल शोषणाच्या बाबतीत लाजिरवाणा रेकॉर्ड; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Pakistan Child Abuse Crime Cases: पाकिस्तानमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले. तेथील लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची आणि वेगाने वाढ झाली.

Manish Jadhav

Pakistan Child Abuse Crime Cases: पाकिस्तानमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले. तेथील लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची आणि वेगाने वाढ झाली. 'डॉन' या प्रसिद्ध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, बालकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या 'साहिल' या नामांकित संस्थेने 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर केली. या अहवालानुसार, जानेवारी ते जून 2026 या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तानमध्ये मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे तब्बल 1 हजार 914 गंभीर गुन्हे समोर आले आहेत. या आकडेवारीने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली असून बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला.

या अहवालातील सर्वात विदारक बाब म्हणजे, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विविध घटनांमधून 49 नवजात बालके बेवारस अवस्थेत आढळून आली. दुसरीकडे, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे 1 हजार 15 गुन्हे दाखल झाले असून, हा सर्वाधिक नोंदवला गेलेला गुन्हा ठरला. याशिवाय, मुलांच्या अपहरणाचे 558 गुन्हे, मुले बेपत्ता झाल्याच्या 101 घटना आणि बालविवाहाचे 35 गुन्हे देखील पोलिसांत नोंदवले गेले. मुलांविरुद्धच्या या गुन्ह्यांची आकडेवारी पाकिस्तानच्या (Pakistan) चारही प्रांतांसह इस्लामाबाद, पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे संकलित करण्यात आली.

या गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या एकूण मुलांपैकी 58 टक्के मुली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, 11 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना सर्वाधिक टार्गेट करण्यात आले असून या वयोगटातील पीडित मुलांची संख्या 598 आहे. यासोबतच 16 ते 18 वर्षे वयोगटातील 365 मुले, 6 ते 10 वर्षे वयोगटातील 329 मुले आणि 5 वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या 95 बालकांचाही यात समावेश आहे. तपासामध्ये असेही उघड झाले की, तब्बल 43 टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार हे पीडित मुलांच्या परिचयाचेच होते, तर 34 टक्के प्रकरणांमध्ये अनोळखी व्यक्तींचा समावेश होता. अत्याचाराच्या जवळपास 45 टक्के घटना या स्वतः पीडित मुलांच्या घरात घडल्या, तर 18 टक्के घटना संशयितांच्या घरी घडल्या.

भौगोलिक आकडेवारीनुसार, या गुन्हेगारी प्रकरणांमधील 57 टक्के घटना शहरी भागांत तर 43 टक्के ग्रामीण भागांत घडल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकूण गुन्ह्यांपैकी तब्बल 80 टक्के गुन्हे एकट्या पंजाब प्रांतात नोंदवले गेले आहेत, तर 15 टक्के गुन्हे सिंध प्रांतात आणि उर्वरित 5 टक्के गुन्हे देशाच्या इतर भागांतून समोर आले आहेत. पाकिस्तानमधील लहान मुलांची ही भयावह स्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंतेचा विषय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT