Pakistan Cricket: 'ते सवलतीच्या गुणांनीही पास होणार नाहीत', WTC मध्ये पाकिस्तानची लाजिरवाणी अवस्था! आकाश चोप्रानं उडवली खिल्ली; VIDEO व्हायरल

Aakash Chopra Comments on Pakistan WTC: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने पाकिस्तानच्या अत्यंत खराब कामगिरीवर सडकून टीका केली.
Akash Chopra on Pakistan WTC performance
Akash Chopra reacting to Pakistan's performance in the World Test ChampionshipDainik Gomantak
Published on
Updated on

Aakash Chopra Comments on Pakistan WTC: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 चा हंगाम अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला. भारतीय संघासाठी आगामी श्रीलंका मालिका ही डब्ल्युटीसी फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानली जात आहे. सध्या क्रिकेट जगतात या शर्यतीची जोरदार चर्चा सुरु असतानाच, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने पाकिस्तानच्या अत्यंत खराब कामगिरीवर सडकून टीका केली. पाकिस्तानचा संघ ग्रेस मार्क्स दिले तरी WTC च्या फायनलमध्ये पोहोचू शकत नाही, असा बोचरा टोला त्याने लगावला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा (Pakistan) संघ सध्या सर्वात शेवटी म्हणजे नवव्या स्थानावर आहे. पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या 5 कसोटी सामन्यांपैकी अवघा एक सामना जिंकला असून 4 सामन्यांत त्यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात अवघे 4 गुण आणि 6.67 टक्के पीसीटी जमा आहेत. या स्थितीवर बोलताना आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, गुणतालिकेत शेवटी आपले शेजारी आहेत आणि त्यांच्याबद्दल काय बोलावे तेच समजत नाही.

Akash Chopra on Pakistan WTC performance
Pakistan Cricket Team: आशिया कपमधील 'अपमानास्पद' पराभव! पीसीबीने घेतला मनावर, 'फ्लॉप शो'मुळे खेळाडूंवर केली कारवाई

काही विद्यार्थी ग्रेस मार्क्स मिळवून तरी पास होतात, पण पाकिस्तानची स्थिती अशी आहे की, त्यांचा रोल नंबरच जप्त केला जाईल. अवघे 6 टक्के गुण हे काय पॉइंट्स आहेत का, असा थेट सवाल करत त्याने पाकिस्तानच्या दयनीय अवस्थेची खिल्ली उडवली.

Akash Chopra on Pakistan WTC performance
Pakistan Team: बाबर आझमचे भगव्या शालीसह हैदराबादमध्ये स्वागत, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

दरम्यान, WTC गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 84 गुणांसह आणि 87.50 टक्के पीसीटीसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका 75 टक्के पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, भारतीय संघ सध्या 9 सामन्यांत 4 विजय, 4 पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह 52 गुण आणि 48.15 टक्के पीसीटी घेऊन पाचव्या क्रमांकावर आहे.

Akash Chopra on Pakistan WTC performance
Pakistan Team: पाकिस्तानची भारताला धमकी, 'विश्वचषकासाठी व्हिसा न मिळाल्याने...'

भारतीय संघाला फायनल गाठायची असेल तर येणारे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. WTC च्या या सायकलमध्ये भारताला अजून 9 सामने खेळायचे आहेत. जर भारताला दुसऱ्या कोणत्याही संघावर अवलंबून न राहता थेट फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. भारतीय संघाने 9 पैकी 8 सामने जिंकल्यास त्यांचा पीसीटी 68.5 वर पोहोचेल, तर सर्व 9 सामने जिंकल्यास पीसीटी 74.1 होईल. यामुळे भारत पुन्हा एकदा WTC च्या फायनलमध्ये धडक मारु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com