Pakistan Bomb Blast: पाकिस्तानातील क्वेट्टा येथील कंधारी मार्केटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील कंधारी मार्केट ईदच्या खरेदीसाठी लोकांनी खचाखच भरले होते. स्फोटानंतर जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.
कंधारी मार्केटमध्ये पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करुन हा स्फोट घडवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमनध्ये अनेक वाहनांचे नुकसान झालेले दिसत आहे. लोक घाबरुन सैरावैरा पळताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये (Pakistan) फोफावत असलेली तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ही दहशतवादी संघटना सातत्याने पोलिसांना लक्ष्य करत आहे.
याआधी, शनिवारी खैबर आदिवासी जिल्ह्यातील बारा तहसीलमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 2 जवान शहीद झाले. या स्फोटात नायब सुभेदार हजरत गुल (37) आणि हवालदार नजीर उल्लाह मेहसूद (34) यांचा मृत्यू झाला होता. हा एक इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस स्फोट होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.