Pakistan black listed Chinese Company
Pakistan black listed Chinese Company Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानने चिनी कंपनीला केले ब्लॅक लिस्ट, आर्थिक संबध बिघडणार?

दैनिक गोमन्तक

सरकारी प्रकल्पासाठी बोली लावताना बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल पाकिस्तानने (Pakistan) एका चिनी कंपनीला (Chinese Company) ब्लॅक लिस्ट केले आहे. तसेच, चिनी (China) कंपनीला एका महिन्यासाठी कोणत्याही सरकारी निविदेत सहभागी होण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे. 'डॉन' या वृत्तपत्राने चिनी कंपनीचे नाव न घेता, पाकिस्तानच्या नॅशनल ट्रान्समिशन अँड डिस्पॅच कंपनीच्या (NTDC) प्रकल्पासाठी बोली लावताना बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल या फर्मला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्याची नोंद केली आहे. (Pakistan black listed Chinese Company)

NTDC च्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयाकडून दोन दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, चिनी फर्मने बनावट कागदपत्रे सादर केल्यामुळे तात्काळ एक महिन्यासाठी एनटीडीसीच्या निविदा किंवा बोली प्रक्रियेत भाग घेण्यापासून वगळले गेले आहे आणि कंपनीला पूर्णपणे ए बंदी घालण्यात आली आहे.त्याचबरोबर एनटीडीसीने कंपनीच्या सध्याच्या करारांवर या आदेशाचा परिणाम होणार नाही असे देखील स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये अनेक चीनी कंपन्या कार्यरत आहेत ज्या पायाभूत सुविधा आणि वीज प्रकल्प उभारत आहेत. या चिनी कंपनीला अशा वेळी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे जेव्हा पाकिस्तान आणि चीन यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे.

या पत्राच्या प्रती NTDC चे व्यवस्थापकीय संचालक, जल आणि विद्युत आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पाकिस्तान अभियांत्रिकी परिषदेचे MD, राष्ट्रीय अभियांत्रिकी सेवा पाकिस्तान यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, हे पत्र सार्वजनिक खरेदी नियामक प्राधिकरण, पाकिस्तानी केंद्रीय वीज खरेदी एजन्सी,तसेच सर्व वीज वितरण कंपन्यांच्या सीईओंना पाठवण्यात आले आहे. यावरून असे दिसून येते की पाकिस्तानला या चिनी कंपनीला कठोर धडा शिकवायचा आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या चिनी कंपन्या मागील बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानात धरणे आणि रस्ते बांधण्याचे काम करत आहेत. या व्यतिरिक्त, चिनी कंपन्या बंदरांवर बांधकाम कार्यातही गुंतलेली आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्लेही वाढले आहेत. उल्लेखनीय म्हणजे 20 ऑगस्ट रोजी ग्वादर पूर्व खाडी द्रुतगती प्रकल्पाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. ज्यावर हल्ला झाला होता त्या ताफ्यात चिनी नागरिकांचा समावेश होता आणि हे सारेजण बलुचिस्तान प्रांतातील एका प्रकल्पाकडे जात होता. ग्वादर हा 60 अब्ज डॉलर्सच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पाचा कळस आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT